टीम निवडीच्या बैठकीत रंगणार जोरदार चर्चा! गंभीर-आगरकर आणि सूर्या यांच्यासमोर 10 मोठे प्रश्न

गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी याच वर्षी इच्छा व्यक्त केली होती की, ते तिन्ही फॉरमॅटमध्ये एकच कर्णधार पाहू इच्छितात. आता परिस्थिती अशी आहे की तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाकडे (Team india) 3 वेगळे कर्णधार आहेत. तीन वेगळे कर्णधार असणे वर्कलोड तर कमी करू शकते, पण यामुळेच निवड समितीसमोर आशिया कप (Asia Cup) स्क्वॉडवर अंतिम निर्णय घेणे कठीण झाले आहे. कसोटी कर्णधार शुबमन गिलला (Shubman gill) टी20 टीममध्ये जागा देणेही अवघड दिसत आहे. यावर शेवटी निवड समिती काय निर्णय घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. खूप लवकरच मुंबईत अजित अगरकर, गौतम गंभीर आणि सूर्यकुमार यादव यांची बैठक होऊ शकते. या बैठकीत 10 प्रश्न असतील, ज्यांनी आशिया कप स्क्वॉडच्या घोषणा होण्यापूर्वी निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाची डोकेदुखी वाढवली आहे.

श्रेयस अय्यरला संधी?
श्रेयस अय्यर चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताचा टॉप स्कोरर (243 धावा) ठरला आणि IPL 2025 मध्ये पंजाब किंग्ससाठी 604 धावा केल्या. या शानदार फॉर्म असूनही त्याला संधी न मिळणे अय्यरशी अन्याय ठरेल. पण मधल्या फळीत तो कसा फिट बसेल? तिसऱ्या क्रमांकावर तिलक वर्मा, चौथ्या स्थानी सूर्यकुमार यादव आणि पाचव्या स्थानी हार्दिक पांड्या येऊ शकतात. तसेच अक्षर पटेल असताना अय्यरला मधल्या फळीत स्थान देणे हा मोठा प्रश्न आहे.

2. उपकर्णधार कोण असेल?
याच वर्षी जानेवारीत अक्षर पटेलला (Axar Patel) टी20 टीमचा उपकर्णधार करण्यात आलं होतं. पण गेल्या काही दिवसांत शुबमन गिलला उपकर्णधार करण्याच्या बातम्यांना जोर मिळाला. जर गिलला उपकर्णधार बनवलं, तर अक्षर पटेलला काढण्यामागचं कारण निवड समितीला द्यावं लागेल.

3.जसप्रीत बुमराहला विश्रांती द्यायची का?
आशिया कपनंतर ऑक्टोबर महिन्यात टीम इंडियाचा कार्यक्रम खूप व्यस्त आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध 2 कसोटी आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 वनडे सामने आहेत. अशा परिस्थितीत आशिया कपमधून बुमराहला विश्रांती द्यायची का? शिवाय, बुमराहने मागील एक वर्ष टी20 क्रिकेट खेळलेलं नाही.

4. लॉर मिडल ऑर्डर – रिंकू सिंगचा शिवम दुबे?
लोअर मिडल ऑर्डरमध्येही गोंधळ आहे. रिंकू सिंगची जागा धोक्यात आहे. सहावा-सातवा क्रमांकासाठी शिवम दुबे आणि वॉशिंग्टन सुंदर देखील रेसमध्ये आहेत, जे बॅटिंगसोबतच बॉलिंगमध्येही योगदान देऊ शकतात.

5.किती स्पिनर खेळवायचे?
आशिया कपसाठी भारताकडे कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि वरुण चक्रवर्ती यांचे पर्याय आहेत. प्रश्न असा आहे की किती स्पिनर टीममध्ये घ्यायचे? कुलदीप आणि वरुण सातत्याने प्रभावी ठरले आहेत. त्यामुळे सुंदरला प्लेइंग इलेव्हनबाहेर बसवावे लागेल का?

6.ओपनिंग कोण करणार?
गंभीर कोच झाल्यानंतर अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनला सलग ओपनिंगमध्ये संधी दिली गेली आणि त्यांनी चांगली कामगिरी केली. यामुळे शुबमन गिल आणि यशस्वी जयस्वालच्या निवडीवर प्रश्नचिन्ह आहे. गिल किंवा जयस्वालला जागा द्यायची असेल, तर अभिषेक किंवा सॅमसनपैकी कोणाचा पत्ता कट होणार?

7.पेस अटॅकमध्ये कोण?
अर्शदीप सिंग टी20 मध्ये भारताचा मुख्य गोलंदाज ठरला आहे. जर बुमराह स्क्वॉडमध्ये आला, तर तिसरा पेसर कोण असेल? कारण रिपोर्टनुसार मोहम्मद सिराजला बाहेर ठेवले जाऊ शकते. बुमराहला विश्रांती दिली तर प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा यांसारखे कमी अनुभवी पर्याय उरतील.

8.दोन विकेटकीपर हवेत का?
संजू सॅमसन पहिली विकेटकीपिंग चॉइस आहे. मागील 10 टी20 डावांत त्याने तीन शतके झळकावली आहेत. पण मिडल ऑर्डरमध्ये जितेश शर्मा या दुसऱ्या विकेटकीपरला स्थान दिलं जाईल का? IPL 2025 मध्ये त्याचा स्ट्राइक रेट 176 होता आणि तो फिनिशरची भूमिकाही निभावू शकतो.

9.शुभमन गिल कुठल्या जागी येईल?
ओपनर म्हणून सॅमसन आणि अभिषेक चमकले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर तिलक वर्माची सरासरी 55 आहे. त्यामुळे टॉप ऑर्डरमध्ये गिलसाठी जागा नाही. मग त्याला मिडल ऑर्डरमध्ये बसवलं तर कोण बाहेर जाणार?

10.आशिया कपसाठी खूप बदल योग्य ठरतील का?
गौतम गंभीर (Gautam Gambhir) कोच झाल्यानंतर एक तरुण टीम तयार करण्यात आली. अभिषेक शर्मा, रिंकू सिंह, तिलक वर्मा, अर्शदीप सिंह यांच्यावर जबाबदारी देण्यात आली. ही टीम गेल्या वर्षभरात एकही टी20 मालिका हरलेली नाही. मग या टीममध्ये मोठे बदल करणे योग्य ठरेल का?

Comments are closed.