झालं हसू! जर्सीवर एवढा मोठा पेप्सीचा लोगो अन् क्रिकेटर काढतोय पाणी बॉटलचं लेबल
सध्या पाकिस्तान सुपर लीग (Pakistan Super League) सुरू आहे. पण पहलगाम हल्ल्यानंतर भारतामध्ये पीएसएलचे लाईव्ह प्रक्षेपण बंद करण्यात आले आहे. यादरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानचा (Mohammad Rizwan) आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये मोहम्मद रिझवानने पिण्यासाठी पाण्याची बाॅटल घेतली आहे. दरम्यान तो पाणी बाॅटलवरील लेबल काढताना दिसला. व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून चाहत्यांनी हस्यास्पद प्रतिक्रिया दिल्या आहेत.
छातीवर इतका मोठा 'पेप्सी' लोगो आहे आणि तो पेप्सी लेबल एका लहान बाटलीतून काढून टाकत आहे. pic.twitter.com/lr4ibp94ln
– MUFADDL विडंबन (@mufaddl_parody) 29 एप्रिल, 2025
मोहम्मद रिझवानच्या (Mohammad Rizwan) आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने पाकिस्तानसाठी 39 कसोटी, 91 वनडे आणि 106 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. 39 कसोटी सामन्यात त्याने 2,273 धावा केल्या आहेत. कसोटीमध्ये त्याने 11 अर्धशतकांसह 3 शतके झळकावली आहेत. कसोटीमधील त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 171 आहे. 91 वनडे सामन्यात त्याने 41.31च्या सरासरीने फलंदाजी करताना 2,644 धावा केल्या आहेत. वनडेमध्ये त्याने 15 अर्धशतकांसह 4 शतके झळकावली आहेत. वनडेमधील त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 131 आहे.
रिझवानने 106 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 93 डावात फलंदाजी करताना 3,414 धावा केल्या आहेत. दरम्याने त्याची फलंदाजी सरासरी 47.41 राहिली आहे. टी20 मध्ये त्याने 30 अर्धशतकांसह 1 शतक झळकावले आहे. दरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 131 आहे.
Comments are closed.