श्रीमंत पत्नीला पोटगीची गरज नसते.

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

जी पत्नी आर्थिक दृष्ट्या संपन्न आणि स्वतंत्र आहे तिला विभक्तीकरणानंतर पोटगी देण्याची आवश्यकता नाही, असा महत्वपूर्ण निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. हाच नियम पतीलाही लागू आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने हा निर्णय एका आर्थिकदृष्ट्या सबळ पत्नीने सादर पेलेल्या याचिकेवर शुक्रवारी दिला आहे.

या प्रकरणातली पत्नी भारतीय रेल्वे विभागात ग्रुप ए श्रेणीत अधिकारी आहे. तिने पतीशी घटस्फोट घेण्यासाठी प्रक्रियेचा प्रारंभ केला आहे. पतीने आपल्याला पोटगी द्यावी अशी मागणी तिने या याचिकेद्वारे केली होती. न्या. अनिल क्षेत्रपाल आणि न्या. हरीष वैद्यनाथन यांच्या खंडपीठासमोर या याचिकेची सुनावणी झाली.

पत्नी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असेल तर तिला पोटगी देण्याचे कारण नाही. कारण पोटगी ही संकल्पना पत्नीला किंवा पतीला श्रीमंत करण्यासाठी नसून सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी आहे. पती किंवा पत्नी आर्थिकदृष्ट्या वाईट स्थितीत असेल, तर त्यांना अशा न्यायाची आवश्यकता असते. हिंदू विवाह कायद्याच्या अनुच्छेद 25 प्रमाणे न्यायालयाला पोटगीचा आदेश देण्याचा अधिकार आहे. मात्र, पोटगी आवश्यकता, पतीची किंवा पत्नीची आर्थिक परिस्थिती अशा अनेक बाबींवर अवलंबून असते. सदरच्या प्रकरणात पत्नी उच्च पदावर अधिकारी आहे. त्यामुळे दिला पोटगी देण्याचा आदेश देण्याची आवश्यकता नाही, असे स्पष्ट केले गेले.

Comments are closed.