लेकरांसाठी काय पण! महिलेचा रोज 350 किमी विमान प्रवास; सकाळी 4 वाजेपासून रात्री 8 वाजेपर्यंत कामच काम
![ेsuper mom](https://marathi.tezzbuzz.com/wp-content/uploads/2025/02/super-mom-696x447.jpg)
दररोज विमानाने तब्बल 350 किमीचा प्रवास करणाऱ्या ‘सुपर मॉम’ने सर्वांचे लक्ष वेधले. मलेशियात राहणाऱ्या हिंदुस्थानी वंशाची राहेल कौर ही महिला एअर एशियामध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करते. ती ऑफिसला जाण्यासाठी आणि परतण्यासाठी दररोज 350 किमी प्रवास करते. विशेष म्हणजे ती दोन मुलांची आई असून आपल्या मुलांसोबत जास्त वेळ घालवता यावा यासाठी या महिलेने हा मार्ग अवलंबला आहे.
2024 पूर्वी ती मलेशियाची राजधानी कुआलालुम्पुरमधील तिच्या ऑफिसजवळ भाडय़ाने राहत होती आणि आठवडय़ातून केवळ एकदाच पेनांगला परतायची, पण यामुळे तिला मुलांना फारसा वेळ देता येत नव्हता. मुले आपल्यापासून लांब राहत असल्याची भावना तिला स्वस्त बसू देत नव्हती. तिला 12 वर्षांची मुलगी आणि 11 वर्षांचा मुलगा आहे. ती दररोज पहाटे 4 वाजता उठते, 5 वाजता विमानतळावर पोहोचते आणि सकाळी 7.45 वाजता ऑफिस गाठते, तर रात्री 8 वाजता घरी परतते. विमान प्रवासादरम्यान राहेल ध्यान करते, संगीत ऐकते. मुलांच्या गरजा लक्षात घेऊन तिने ही जीवनशैली स्वीकारली आहे.
Comments are closed.