आणि मुख्यमंत्री व गद्दार उपमुख्यमंत्री बेस्टमध्ये 150 नवीन बसेस दाखल झाल्याचा उत्सव साजरा करतात, आदित्य ठाकरे यांची टीका

भाजपने बेस्ट बसच्या भाड्यात वाढ केली त्यामुळे प्रवाशी संख्या घटली असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी केली. तसेच मुख्यमंत्री व गद्दार उपमुख्यमंत्री बेस्टमध्ये 150 नवीन बसेस दाखल झाल्याचा उत्सव साजरा करतात, अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली.

एक्सवर पोस्ट करून आदित्य ठाकरे म्हणाले की, बेस्ट बसच्या भाड्यांमध्ये भाजप सरकारने इतिहासात कधीही एवढी झाली नव्हती तेवढी दुप्पट भाडेवाढ केली आहे. भाजपसरकारमुळे बेस्टच्या बस ताफ्यात इतिहासात कधीही झाली नव्हती एवढी मोठी घट झाली आहे. भाजप सरकारमुळे बेस्टच्या प्रवाशांची संख्या घटली आहे, आणि खासगी बस कंपन्यांना परवानगी देऊन बेस्टला संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा प्रकार कधीच झाला नव्हता. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की बेस्टने राज्य सरकारकडून मदत न मागता भाड्याशिवाय इतर उत्पन्नावर अवलंबून राहावे.
बस कमी = फेऱ्या कमी…
भाडे दुप्पट = प्रवासी कमी…
बसस्थानके जाहिरातींच्या फलकांमध्ये रूपांतरित…आणि मुख्यमंत्री व गद्दार उपमुख्यमंत्री बेस्टमध्ये 150 नवीन बसेस दाखल झाल्याचा उत्सव साजरा करतात. काय विनोद आहे हा असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

Comments are closed.