लोखंडवाला तलाव वनक्षेत्र घोषित करा; आदित्य ठाकरे यांची राज्य सरकारकडे मागणी

मुंबईतील लोखंडवाला तलावाची सहा वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर साफसफाई सुरू करण्यात आली आहे. तेथील स्थानिक आमदार आणि लोकांच्या पुढाकाराने लोखंडवाला तलावाची साफसफाई करण्यात येत आहे. यासंदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनाप्रमुख, नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी राज्य सरकारकडे लोखंडवाला तलावाला वनक्षेत्र घोषित करण्याची मागणी केली आहे.
आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट करत लोखंडवाला तलावाच्या साफसफाईवर प्रतिक्रिया दिली. लोखंडवाला तलाव राज्य सरकारने वनक्षेत्र घोषित करावा. आमच्या महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात मी वन विभागाला त्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यास सांगितले होते. पण दुर्दैवाने आमचे सरकार पाडल्यामुळे हा प्रश्न प्रलंबित ठेवण्यात आला. दरम्यान, आता आमचे आमदार हारून खान आणि स्थानिक नागरिकांनी या तलावाची स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे आणि याचा मला आनंद आहे. राज्य सरकार या लोखंडवाला तलावाचे अधिकृतपणे संरक्षण करेल, अशी आशा आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
राज्य सरकारने लोकंदवाला तलावाला वन जमीन घोषित करावी लागेल.
आमच्या एमव्हीएच्या कार्यकाळात, मी जंगलाच्या विभागाला त्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यास सांगितले होते.
दुर्दैवाने हे आमच्या सरकारला खाली पडल्यापासून हे थांबविण्यात आले आहे.
मला आनंद झाला…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) 16 मे, 2025
Comments are closed.