वरळी पोलीस कॅम्पमध्ये सिमेंट काँक्रीटचा जलकुंभ उभारण्यासाठी विशेष निधी द्या, आदित्य ठाकरे यांचे अर्थमंत्र्यांना पत्र

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते,युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात येणाऱ्या पोलीस कॅम्पमधील पाण्याच्या 20 टाक्यांपैकी 12 टाक्या फुटल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी सिमेंट काँक्रीटचा जलकुंभ उभारावा व त्यासाठी विशेष निधी द्यावा अशी मागणी करणारे पत्र आदित्य ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवार यांना लिहले आहे.
माझ्या वरळी मतदार संघातील पोलीस कॅम्प येथे कायमस्वरूपी सिमेंट काँक्रीटचा जलकुंभ बसविण्यात यावा, ह्यासाठी वित्त व नियोजन, उपमुख्यमंत्री सन्मा.अजित पवार जी ह्यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली. pic.twitter.com/1pnwiqi8r1
— Aaditya Thackeray (@AUThackeray) 17 जून, 2025
”मी प्रतिनिधित्व करत असलेल्या वरळी विधानसभा मतदार संघाअंतर्गत वरळी पोलीस कॅम्प इमारत क्र. 1 ते 36 या शासकीय पोलीस वसाहतीकरिता पाणीपुरवठ्यासाठी 10 लाख लीटर क्षमतेचा सिमेंट काँक्रीटचा जलकुंभ होता. परंतु धोकादायक परिस्थितीमुळे तो निष्कासित करण्यात आला असून. त्यांनतर, तात्पुरता पर्याय म्हणून सिंटेक्सच्या टाक्या बसविण्यात आल्या आहेत. परंतु या 20 टाक्यांपैकी 12 टाक्या सध्या फुटलेल्या स्थितीत आहेत. यासाठी कायमस्वरूपी पर्याय म्हणून त्याच ठिकाणी सिमेंट काँक्रीटचा जलकुंभ बसविणे आवश्यक आहे. तरी सदर निवेदनाद्वारे मी आपणास नम्र विनंती करतो की, आपण या कामासाठी विशेष निधी वर्ग करून संबंधित यंत्रणेला आदेश द्यावेत”,असे आदित्य ठाकरे यांनी पत्रात नमूद केले आहे.
Comments are closed.