खरात प्रकरणात 9 ते 10 मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा; आदित्य ठाकरे यांची मागणी
राज्यभरात भोंदू अशोक खरात प्रकरण चांगलेच गाजत आहे. या भोंदू बाबाचे अनेक राजकीय नेत्यांशी संबंध असल्याचेही उघड होत आहे. या प्रकरणी या भोंदूबाबासह त्याच्या भोंदू भक्तांवरही कारवाई होण्याची गरज आहे. पुरोगामी महाराष्ट्रात याआधी असे प्रकार कधी घडले नव्हते. मंत्रीमंडळातील 9 ते 10 मंत्र्यांचा खरातशी संबंध असल्याचे उघड झाले आहे, त्या मंत्र्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा घेणे गरजेचे आहे, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रात भोंदू बाबांची कधीही संस्कृती नव्हती.भोंदू बाबा आणि त्यांचे भोंदू भक्त या दोघांवरही कारवाई होण्याची गरज आहे. भोंदू बाबाचे दराआडचे प्रकार वेगळे आहेत. तसेच रेडे वैगरे जे काही प्रकार ऐकण्यात येत आहेत, ते गंभीर आहे. आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात अशा गोष्टी कधी घडल्या नव्हत्या किंवा ऐकण्यात आल्या नव्हत्या. या सर्व गोष्टीच्या आडून राजकारण होत आहे, हे भयानक आहे. त्या भोंदू बाबाचे ज्या नेत्यांसोबत संबंध आहेत, किंला गेल्या काही दिवसात त्याचे ज्यांच्यासोबत फोटो उघड झाले आहेत, त्या सर्वांनी राजीनामा देणे गरजेचे आहे. मंत्रिमंडळातील 9 ते 10 मंत्री या भोंदू बाबाशी संबंधीत आहेत, त्या सर्वांचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेणे गरजेचे आहे.
Comments are closed.