आदित्य ठाकरे उद्यापासून शेतकऱ्यांच्या बांधावर, दोन दिवसांत मराठवाडय़ातील आठ जिह्यांमध्ये दुष्काळ पाहणी
महाराष्ट्रात भीषण दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे प्राण पंठाशी आले आहेत. दुसरीकडे महायुती सरकारही दुष्काळ जाहीर करण्यास चापल करत आहेत. यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱांना धीर देण्यासाठी, त्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे 26 सप्टेंबरपासून मराठवाडा दौऱ्यावर जाणार आहेत.
आदित्य ठाकरे यांचा हा दौरा दोन दिवसांचा आहे. या दोन दिवसांत ते मराठवाडय़ातील सोलापूर, धाराशीव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या आठ जिह्यांमध्ये दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करणार आहेत. थेट शेताच्या बांधावर जाऊन ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
26 सप्टेंबरला दक्षिण सोलापूरच्या बोरामणी येथून आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. त्यानंतर धाराशीवमधील खानापूर, आष्टा मोड, लातूरच्या तावशी ताळ, नांदेडच्या गऊड आणि हिंगोलीच्या माळवाटा शिवार या गावांमधील दुष्काळग्रस्त भागाला ते भेट देणार आहेत. 27 सप्टेंबर रोजी परभणी येथील टाकळी पुंभकर्ण, जालना येथील वरफळ आणि रामनगर साखर कारखाना तसेच छत्रपती संभाजीनगरमधील भगतवाडी येथे आदित्य ठाकरे यांचा दौरा होणार आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद आहे.
Comments are closed.