आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर, तपोवनाला देणार भेट; देवळालीत शिवसेना पदाधिकारी मेळावा

महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून उद्या शनिवारी, 27 डिसेंबर रोजी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर येत आहेत. तपोवनातील अठराशेहून अधिक झाडे तोडून त्या जागी माईस हब उभारण्याचा घाट महापालिकेने घातला, त्याविरोधात पर्यावरणप्रेमी नाशिककरांनी आवाज उठवला. शिवसेनेनेही या वृक्षतोडीला कडाडून विरोध करीत आंदोलन केले. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उद्या शनिवारी नाशिक येथे सकाळी 11 वाजता तपोवनाला भेट देऊन पाहणी करतील, पर्यावरणप्रेमींशी चर्चा करतील. त्यानंतर देवळालीजवळील विहितगाव येथील साई ग्रॅण्ड लॉन्स येथे दुपारी 12 वाजता शिवसेना शहर पदाधिकाऱयांचा मेळावा होणार आहे.
…अन् बाळासाहेबांची आठवण झाली
क्रांती चौकातून निघालेली मशाल रॅली गुलमंडीवर पोहोचली. गुलमंडीवर व्यासपीठ बनवलेले नव्हते. एका जीपच्या टपावर उभे राहून आदित्य ठाकरे यांनी दणदणीत भाषण केले. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात जीपच्या टपावर चढूनच भाषण केले होते. आदित्य ठाकरे यांचे भाषण पाहून शहरवासीयांना शिवसेनाप्रमुखांच्या त्या भाषणाची आठवण झाली.
पालकमंत्र्यांच्या बॅगेत पैसे कुठून आले?
शहरात पाणी नाही, रस्ते नाहीत पण पालकमंत्री मात्र पैशाच्या गड्डय़ा मोजताना दिसताहेत! पालकमंत्र्यांच्या बॅगेत कुठून आले हे पैसे, असे आदित्य ठाकरे यांनी विचारताच ‘पन्नास खोके, एकदम ओक्के’चा नारा गुलमंडीवर घुमला.
खासदाराची दारूची दुकाने वाढली
छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांची अगोदर दारूची 12 दुकाने होती, आता 20 झाली आहेत. त्यांच्या दुकानावर नोकरी करणार का? असा संतप्त सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. सध्या फक्त महाराष्ट्र लुटण्याचे काम सुरू आहे. हे रोखायचे असेल तर पर्याय एकच, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे आदित्य ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.

Comments are closed.