तपोवनमध्येच नेमकं साधुग्राम का? आदित्य ठाकरेंनी नाशिकमधील बिल्डरच्या व्हिडीओचा दाखला देत सगळंच
नाशिक वृक्षतोडीवर आदित्य ठाकरे नाशिकमध्ये 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Kumbh Mela 2027) तयारीला जोरदार सुरुवात झाली असली, तरी तपोवन (Tapovan) परिसरातील प्रस्तावित साधूग्राम (Sadhugram) प्रकल्पामुळे 1800 झाडांची तोड (Tree Cutting) होणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. साधू-महंतांच्या तात्पुरत्या निवासासाठी 1150 एकरांवर साधूग्राम उभारण्याचे नियोजन असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करावी लागणार आहे. या निर्णयाचा तपोवनातील वृक्षतोडीला शिवसेना ठाकरे गट, मनसे, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट यांच्यासह पर्यावरणप्रेमी, आणि सेलिब्रिटींनी तीव्र विरोध दर्शवला आहे. आता ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी नाशिकमधील बिल्डरच्या एका व्हिडीओचा दाखला देत भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय.
आदित्य ठाकरे म्हणाले की, तपोवन… आज नागरिकांनी स्वच्छता मोहीम हाती घेतली. पण जी जागा आपण स्वच्छ करत आहोत, ती भाजपला अगदी ‘साफ’ करून टाकायची आहे. तपोवनमध्येच का नेमका साधुग्राम? एक व्हिडीओ नाशिकच्या एका बिल्डरने काही दिवसांपूर्वी शेअर केला आहे. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली आणि असं सुचवलं गेलं की, साधुग्राम करून ग्रीन झोनमधून यलो झोनमध्ये… म्हणजेच जंगलाला रेसिडेंशिअल झोन करता येईल. TDR वापरता येईल. तो व्हिडीओ आपण पाहिलात का? बिल्डर कोण आहे? नाशिकवर खरंच प्रेम आहे का? त्यांच्या सोशल मिडियावर होता आणि त्याच्या बाजूला बसले होते ते नाशिक भाजपचे खजीनदार. हा साधूंचा नाही, तर TDR आणि खजिन्याचा खेळ तर नाही ना? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. त्यामुळे आता हा बिल्डर नेमका आहे तरी कोण? अशी चर्चा सुरु झाली आहे.
तपोवन…
आज नागरिकांनी स्वच्छता मोहीम हाती घेतली! पण जी जागा आपण स्वच्छ करत आहोत, ती भाजपला अगदी ‘साफ’ करून टाकायची आहे.
तपोवनात नेमाचा साधुग्राम म्हणजे काय?
एक व्हिडीओ नाशिकच्या एका बिल्डरने शेअर काही दिवसांपूर्वी केला आहे.
मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली आणि असं सुचवलं गेलं की… pic.twitter.com/OuOtG4tGNN
— Aaditya Thackeray (@AUThackeray) 6 डिसेंबर 2025
Aaditya Thackeray on Nashik Tree Cutting: तपोवन आम्हाला हवं आहे. पण…
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, नाशिक महानगरपालिका जर ह्यांच्या हाती गेली, तर नाशिक विकायला काढतील, हे तर स्पष्ट आहे. धर्माचा पडदा आहे. 700 झाडे स्थगितीनंतर कापणार, असं भाजपची बिल्डर-राजवट नाशिकला धमकावून सांगत आहे. साधुग्राम आम्हाला हवं आहे. तपोवन आम्हाला हवं आहे. पण भाजपच्या बिल्डर मित्रांची दादागिरी नाही, असा हल्लाबोल त्यांनी केलाय.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.