ही नागरिकांना दिलेली शिक्षाच? गणपतीसाठी गावी निघाललेल्या कोकणवासीयांसाठी आदित्य ठाकरे यांची बाप्पाकडे प्रार्थना

गणेशोत्सव जवळ आला आहे. आणि मुंबईतले कोकणवासी आपल्या गावी निघाले आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी कोकणवासीयांसाठी बाप्पाकडे प्रार्थना केली आहे.
एक्सवर पोस्ट करून आदित्य ठाकरे म्हणाले आहेत की, राज्यभरातील कोकणवासीय चाकरमानी गणेशोत्सवासाठी गावी निघालेत. पण रस्त्यांची दयनीय अवस्था, रेल्वेतील अनियंत्रित गर्दी, तिकिटासाठी बारा-बारा तास ताटकळत रांगेत उभं राहणं, ही नागरिकांना दिलेली शिक्षाच? गणराया… कोकणवासीय तुझ्या भेटीसाठी आतुरतेने गावी निघाले आहेत. त्यांचा प्रवास सुखाचा आणि सुरक्षित होऊ दे! आणि दरवर्षी कोकणवासीयांच्या संयमाची परीक्षा घेणारे हे विघ्न दूर होऊ दे! अशी प्रार्थना आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
राज्यभरातील कोकणवासीय चाकरमानी गणेशोत्सवासाठी गावी निघालेत.
पण रस्त्यांची दयनीय अवस्था, रेल्वेतील अनियंत्रित गर्दी,
तिकिटासाठी बारा-बारा तास ताटकळत रांगेत उभं राहणं,
ही नागरिकांना दिलेली शिक्षाच?गणराया…
कोकणवासीय तुझ्या भेटीसाठी आतुरतेने गावी निघाले आहेत. त्यांचा प्रवास…— Aaditya Thackeray (@AUThackeray) ऑगस्ट 24, 2025
Comments are closed.