असा कुठला सर्व्हे असतो जो घरात डोकावतो? आदित्य ठाकरे यांच्या सवाल

मातोश्री जवळ काही ड्रोन घिरट्या घालताना दिसले होते. बीकेसीच्या सर्वेक्षणासाठी हे ड्रोन वापरल्याचे पोलिसांनी सांगितले.  असा कुठला सर्वे असतो जो घरात डोकावतो? असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे.

एक्सवर पोस्ट करून आदित्य ठाकरे म्हणाले की, आज सकाळी आमच्या घरात डोकावणारा एक ड्रोन पकडण्यात आला आणि जेव्हा माध्यमांना याची माहिती मिळाली, तेव्हा MMRDA अधिकाऱ्यांनी सांगितले की हा बीकेसीसाठी करण्यात येणारा सर्व्हे होता आणि त्याला मुंबई पोलिसांची परवानगी होती.

कुठला असा सर्व्हे असतो जो घरात डोकावतो आणि पकडल्यावर लगेच उडून जातो? रहिवाशांना याबद्दल आधी का कळवले गेले नाही? MMRDA फक्त आमच्या घरावरच नजर ठेवत आहे का की संपूर्ण बीकेसीवर? MMRDA ने जमिनीवर उतरून आपल्या निकृष्ट कामावर लक्ष द्यावे, जसे की MTHL (अटल सेतु) जो त्यांच्या भ्रष्टाचाराचे जिवंत उदाहरण आहे. आणि जर पोलिसांनी खरंच परवानगी दिली होती, तर रहिवाशांना याची माहिती का देण्यात आली नाही? असे आदित्य ठाकरे म्हणाले.

Comments are closed.