नवीन कितीही शहरे बनवा, मुंबईचे महत्त्व कमी होणार नाही; आदित्य ठाकरे यांनी ठणकावले
सरकारकडून स्मार्ट सिटीचा गवगवा करण्यात आला. मात्र, ही स्मार्ट शहरे फक्त कागदावरच राहिल्याचे दिसत आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईजवळ तिसरी मुंबई म्हणजेच नैना सिटी उभारणीबाबत मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. त्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, नवीन कितीही शहरे बनवा, पण मुंबईचे महत्तव कमी होणार आहे. आम्ही नवीन शहराचे स्वागतच करतो. मात्र, मुंबईतील समस्या आधी सोडवा, असे सांगत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे मुंबईतील समस्यांकडे लक्ष वेधले आहे.
याबाबत आदित्य ठाकरे यांनी एक्सवर मुख्यमंत्र्यांसाठी पोस्ट केली आहे, त्यात त्यांनी म्हटले आहे की, प्रिय मुख्यमंत्री महोदय, आपण महाराष्ट्रात आणखी शहरे उभारणार असल्याचा असल्याचा आनंद आहे, पण मुंबईचा व्यवसाय राजधानी म्हणून काळ संपलेला नाही. अशी नवीन कितीही शहरे उभारा पण मुंबईचे महत्त्व कमी होणार नाही. मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा भाजपचा डाव आहे. मात्र, आम्ही आणि मुंबईकर तो यशस्वी होऊ देणार नाही, असेही आदित्य ठाकरे यांनी ठणकावले आहे.
प्रिय मुख्यमंत्री सर, महाराष्ट्रात अधिक शहरे मिळाल्यामुळे आनंद झाला, पण
• व्यवसायाची भांडवल म्हणून मुंबईचा काळ संपला नाही.
• हे भाजपाने मुंबईला आर्थिकदृष्ट्या आणि गेल्या संपूर्ण दशकात वित्त भांडवल म्हणून पद्धतशीरपणे प्रयत्न केला आहे.
Gift भेट असूनही… https://t.co/jkij2loxcb
— Aaditya Thackeray (@AUThackeray) 1 मार्च, 2025
गेल्या संपूर्ण दशकभरात भाजपनेच मुंबईला आर्थिकदृष्ट्या संपवण्याचा आणि मुंबईचे आर्थिक राजधानी हे महत्त्व कमी करण्याचा पद्धतशीरपणेप्रयत्न केला आहे. भाजपने GIFT ची उभारणी केली. त्यांना अनेक विशेषाधिकार, प्रोत्साहने दिले. मात्र, मुंबईचे महत्त्व कमी झालेले नाही आणि ते होणारही नाही. तसेच नैना सिटी राज्याकडून उभारली जाणार की, भाजपच्या खऱ्या मालकाकडून? असा सवाल करत त्यांनी जबरदस्त टोला लगावला आहे.
तेच नैना सिटीला GIFT शहरासारखेच प्रोत्साहन कर आणि लाभ मिळतील का? असा सावलही त्यांनी केला आहे. जागतिक स्तरावर वित्त/व्यवसाय/व्यापार केंद्रे म्हणून मुंबईसारखी शहरे त्यांचे महत्त्व टिकवून आहेत. ही शहरे त्यांच्या नैसर्गिक आणि भोगौलिक स्थानामुळे अनेक दशकांपासून अस्तित्वात आहेत. त्यामुळे मुंबईला संपवण्याचे कितीही प्रयत्न झाले तरी मुंबईचे महत्त्व कमी होणार नाही, असेही आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.
नैना शहर नवी मुंबईसारखेच स्वतःच्या बळावर वाढेल आणि बहरेल. या नवीन शहराला आमचा पाठिंबा आहे. अशी कितीही शहरे उभारा. मात्र, मुंबईचे महत्त्व कमी करू नका. मुंबईहून दिल्ली आणि इतर राज्यांमध्ये मुख्यालये आणि कार्यालये हलवणे थांबवा. मुंबईतील उद्योगधंदे इतर राज्यात पळवून नेण्याचे थांबवा, असेही आदित्य ठाकरे यांनी ठणकावले.
मुंबईचे महत्त्व जपा आणि अशा नवीन शहरांच्या उपक्रमाला आमचा पाठिंबा आहे. अशा शहरांचे आम्ही स्वागत करतो. मात्र, नवीन शहरांच्या उभारणीबाबत बोलण्यापूर्वी मुंबईतील वायू प्रदूषणाची समस्या गंभीर झाली आहे, हे मान्य करून त्यावर उपाययोजना करा. तसेच सरकारमधील तुमच्या मित्रपक्षांनी निर्माण केलेल्या समस्या, खोदलेले रस्ते आणि त्यांनी निर्माण केलेला गोंधळ दूर कारा, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
Comments are closed.