बीडीडी चाळींचा पुनर्विकास, कोस्टल रोड, डिजिटल शाळा, हिंदमाता पूरमुक्त; शिवसेनेने करून दाखवले, आदित्य ठाकरे यांचे जबरदस्त प्रेझेंटेशन
मशाल हाती घेऊन मुंबई वाचवायची वेळ आली!
व्होट चोर, नोंद चोर, आणि क्रेdet चोरांना रोखायलाच हवे!
धारावीचा लढा कोणत्याही व्यक्तीच्या किंवा कंपनीच्या विरुद्ध नाही. ज्या लोकांसाठी तुम्ही हे करताय त्यांना आधी त्यांच्या हक्काची घरे द्या. नाहीतर येथे तुम्हाला काम करू देणार नाही. एकही व्यक्ती धारावीतून हलणार नाही.
वरळीच्या एनएससीआय डोममध्ये झालेल्या दणदणीत मेळाव्यात शिवसेना नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या विकासकामांचे जबरदस्त प्रेझेंटेशन केले. बीडीडी चाळींचा पुनर्विकास, कोस्टल रोड, डिजिटल शाळा, पूरमुक्त हिंदमातासह मुंबईतील असंख्य विकासकामांची यादीच त्यांनी मुंबईकरांसमोर ठेवली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी मुंबईची लूट करणाऱया मिंधे-भाजपवर जोरदार घणाघात केला. ‘मुंबईचे अदानीस्तान होऊ देणार नाही. व्होट चोर, नोट चोर, व्रेडिट चोरांना रोखायलाच हवे,’ असे आवाहन करतानाच, ‘मशाल हाती घेऊन मुंबई वाचवायची वेळ आली आहे,’ अशी साद आदित्य ठाकरे यांनी घातली.
’करून दाखवले ते अभिमानाने सांगूया’ असा संदेश देणारा हा मेळावा हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीत पार पडला. शिवसेनेच्या कार्यकाळात झालेली विकासकामे आदित्य ठाकरे यांनी पह्टो, व्हिडिओ आणि तारखांनिशी मांडली. शिवसेनेच्या या कामाचे व्रेडिट आता भाजप घेत आहे. ही व्रेडिटचोरी करण्यापेक्षा तुम्ही काय केले ते या एनएससीआय डोममध्ये येऊन जाहीर करा, असे आव्हानच आदित्य ठाकरे यांनी मिंधे व भाजपला दिले.
मुंबई लुटणायांना आत टाकायचे आहे!
’मुंबई आपल्याला फुकट मिळालेली नाही. हुतात्म्यांच्या बलिदानातून, त्यागातून मिळाली आहे. ही आपली मुंबई मिंधे व भाजपवाले लुटत आहेत. या मुंबई लुटणायांना आत टाकण्यासाठी आपल्याला महापालिका जिंकायची आहे. योगायोग म्हणजे संयुक्त महाराष्ट्र लढयातील हुतात्मा स्मारकावर जी मशाल आहे, तेच शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आहे. हीच मशाल हाती घेऊन आता मुंबई वाचवण्याची वेळ आली आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
आमच्या कामाचे व्रेडिट घेऊ नका!
शिवसेनेच्या काळात झालेल्या अनेक विकासकामांमुळे मुंबईकरांना नागरी सेवासुविधा मिळत आहेत. मात्र मिंधे-भाजपकडून ही कामे आपणच केल्याचे सांगत व्रेडिट लाटले जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री साहेब, तुम्ही आमच्या कामांचे व्रेडिट घेऊ नका, आम्ही तुमच्या कामाचे व्रेडिट घेणार नाही. तुमच्या फसलेल्या नोटाबंदीचे, स्किल इंडियाचे, रुपया घसरल्याचे, बेरोजगारीचे, ठेवी घटल्याचे, विकासकामे रखडल्याचे व्रेडिट आम्ही घेत नाही, असा सणसणीत टोलाही आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
मुंबईचे अदानीस्तान होऊ देणार नाही
मिंधे-भाजपचा डोळा फक्त पालिकेच्या तिजोरीवर आहे. सरकार धारावी, मुलुंड, विक्रोळी, कुर्ल्याच्या जमिनी अदानीच्या घशात घालत आहे. मात्र लक्षात ठेवा, जोपर्यंत धारावीकरांना त्यांच्या हक्काचे घर देत नाही तोपर्यंत आम्ही इथे कोणतेही काम करू देणार नाही, एकही व्यक्ती इथून जाणार नाही. मुंबईचे अदानीस्तान होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
Comments are closed.