निवडणूक आयोगावर बोलले की भाजपला झोंबते, शरद पवारांच्या विधानावर आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना मोठा गौप्यस्फोट केला. विधानसभेपूर्वी दोन लोक मला दिल्लीत भेटले आणि त्यांनी 160 जिंकण्याची गॅरंटी दिली होतीअसे पवार म्हणाले. यावर आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

'शरद पवार अनेक वर्षांपासून राजकारणामध्ये आहेत. त्यांचा अनुभव मोठा आहे. शरद पवार यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक निवडणुका पाहिल्या आहेत. पहिल्यांदा कदाचित मतचोरी जी होतेय ती एवढ्या उघडपणे झालेली असावी. साधारणपणे निवडणूक आयोग भाजपच्या कार्यालयातून चालतो हे कळायला लागलेले आहे. अनेकदा असे होते की आम्ही निवडणूक आयोगावर बोलतो आणि झोंबते भाजपला'असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला. तसेच राहुल गांधी यांनी काय खरे, काय खोटे हे पुराव्यानिशी दाखवल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले.
https://www.youtube.com/watch?v=xchiqhtbu_o

ठाकरे बंधुंच्या युतीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, 'दोन्ही भाऊ अनेक वर्षानंतर बोलत आहेत. अनेक ठिकाणी आंदोलनं किंवा स्थानिक पातळीवर निवडणुका एकत्र लढत आहेत. पुढचा निर्णय दोन्ही भाऊ घेतील. मुंबई, महाराष्ट्राच्या हिताचे असेल ते नक्की होईल.'

ठाकरे बंधुंची युती ‘इंडिया’ आघाडीचा विषय नाही; मराठी भाषा, अस्मिता, महाराष्ट्राचं रक्षण हाच केंद्रबिंदु! – संजय राऊत

दरम्यान, सिद्धेश शिंदे यांच्याविरोधात करण्यात आलेल्या तक्रारीवर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. फेकनाथ मिंधे गटाकडून रडीचा डाव खेळला जात असून सत्तेचा दुरुपयोग होत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनाही कळत आहे. मिंधेच्या आमदाराने रॅपीडोवर कारवाईची धमकी दिली आणि त्याच्यानंतर स्वत:च्या मुलासाठी स्पॉन्सरशीप घेतली. असे जर चालत राहिले तर आपल्या राज्यात कुठले गुंतवणूकदार येणार? असा सवाल करत आदित्य ठाकरे म्हणाले की, मंत्री येतात, धमकावतात आणि स्पॉन्सरशीप घेतात. म्हणजे जबराना पण आमि नजराना पण. ही अधिकृत खंडणीत असून महाराष्ट्राला पुढे न्यायचे असेल तर सत्तेतील खंडणीखोरांना बाहेर काढावे लागेल, असेही ते म्हणाले.

हे शपथपत्र मागतायत, मी संसदेत संविधानाची शपथ घेतली आहे; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्ला

Comments are closed.