पाकिस्तानसोबत खेळण्यासाठी बीसीसीआयने दिलेलं कारण म्हणणं हा एक विनोदच, आदित्य ठाकरे यांनी फटकारले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात पाकिस्तानला इशारा देत म्हणाले की, हिंदुस्थानने ठरवले आहे की, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही…”. एकिकडे पंतप्रधान अशी घोषणा करत असताना बीसीसीआय मात्र पाकिस्तानसोबत क्रिकेटचा सामना खेळण्यावर ठाम आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी BCCI ला फटकारले आहे.

”लाल किल्ल्यावरून आज पंतप्रधानांनी जे सांगितलं, त्यापेक्षाही आपण वरचढ आहोत असं जर बीसीसीआय ला वाटत असेल तर खरच ही एक लाजिरवाणी गोष्ट आहे. पहलगाम हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचं जगाला पटवून देण्यासाठी केंद्र सरकारने आणि आपल्या देशाने इतके प्रयत्न केले, तरीही सशस्त्र दलांचं बलिदान, देश आणि अगदी पंतप्रधानांनीच सांगितल्याप्रमाणे “रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही” यापेक्षाही BCCI चा हव्यास वरचढ ठरतोय. ICC मध्ये BCCI ची असलेली पत पाहता, “आम्ही आशिया चषकाच्या नियमांनी बांधलेलो आहोत” असं म्हणणं हा एक विनोदच आहे”, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी बीसीसीआयला फटकारले.

आशिया कप मालिकेत 14 सप्टेंबरला हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. बीसीसीआय या स्पर्धेचा यजमान आहे. मात्र हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळे सामने संयुक्त अरब अमिरातीत आयोजित केले जात आहेत

Comments are closed.