आपल्या देशात कशाप्रकारे निष्पक्ष निवडणूका होत नाही ते संपूर्ण जग पाहतंय – आदित्य ठाकरे

काँग्रेसचे खासदार व लोकसभेतील विरोधी पक्षनेत राहुल गांधी यांनी आज हरयाणात कशाप्रकारे व्होटचोरी झाली त्याचे प्रात्यक्षिक दाखवले. हरयाणात एका ब्राझिलियन मॉडेलने 22 वेळा वेगवेगळ्या नावांनी मतदान केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. त्याबाबत ट्विट करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी सत्ताधारी व निवडणूक आयोगाला फटकारले आहे.

”पुन्हा एकदा, राहुल गांधी यांनी आज निवडणूक आयोगाच्या फसवणुकीचा पर्दाफाश केला आहे. यामुळे भाजपला मतचोरीद्वारे राज्ये काबीज करण्यास मदत होते. संपूर्ण जग पाहत आहे की आपल्या देशातील निवडणुका कशाप्रकारे मुक्त आणि निष्पक्ष होत नाहीत. राहुल गांधी, काँग्रेस किंवा इंडिया आघाडीशी कोणीही सहमत किंवा असहमत असू शकते पण हे सर्व राजकारण किंवा एखाद्या विचारसरणीबद्दल नाही. ‘वोट चोरी’ या कार्यक्रमाचे सादरीकरण प्रत्येकाने पाहिले पाहिजे. त्याची राजकीय विचारसरणी कोणतीही असू देत त्याने हे सादरीकरण पाहायला हवे. निवडणूक आयोगाने एका राजकीय पक्षाला बनावट मतदारांना मतदार यादीत स्थान दिल्यामुळे तुमच्या मतांची किंमत शून्य झाली आहे. गेल्या काही वर्षांत, भारतीय निवडणूक आयोगाने जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत मुक्त आणि निष्पक्ष निवडणूका होऊ नये म्हणून मोठा घोटाळा केला आहे. कुणीही जिंको किंवा हरो, प्रत्येक देशवासियाला समान मताचा अधिकार आहे! काही दिवसांपूर्वीच, आम्ही वरळी आणि महाराष्ट्रातील काही इतर मतदारसंघांमध्ये मतदार फसवणूक उघडकीस आणली. आम्ही दुबार मतदारांविरोधात एक मोठे आंदोलन केलं. पण निवडणूक आयोग कारवाई करण्यास तयार नाही. राहुल गांधींनी स्पष्टपणे सिद्ध केले आहे की हरियाणाची निवडणूक चोरली आहे. खोट्या मतदारांची नावे यादीत टाकून हरियाणातील खऱ्या लोकांना आवाज दाबण्यात आला आहे. संपूर्ण देशात मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकीसाठी हा लढा आहे. हा लढा लोकशाही आणि आपल्या संविधानासाठी आहे”, असे आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे

Comments are closed.