‘भाजपला निसर्ग नष्ट करण्याचा विचित्र हव्यास’; आदित्य ठाकरेंनी डागली तोफ
वाढत्या प्रदूषणाच्या (AQI) समस्येवर आणि अरावली डोंगररांगांच्या रक्षणासाठी नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. या जागरूकतेचे स्वागत करतानाच, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी भारतीय जनता पक्ष सरकारवर सडकून टीका केली आहे. भाजप सरकारला निसर्ग नष्ट करण्याचा जणू ‘विचित्र हव्यास’ जडला आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
पर्यावरणाचा ऱ्हास देशासाठी घातक
आदित्य ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘लोक पर्यावरणासाठी आणि विशेषतः अरावली डोंगररांगांसाठी आवाज उठवत आहेत, हे पाहून आनंद होत आहे. पण निसर्गाचा प्रत्येक अंश नष्ट करण्याच्या भाजप सरकारांच्या धडपडीमागचे कारण मला समजत नाही.’ अरावली पर्वत हे दिल्ली, राजस्थान, हरियाणा आणि गुजरात अशा चार राज्यांमधून जाणारे देशाचे महत्त्वाचे भौगोलिक वैशिष्ट्य असल्याचेही त्यांनी नमूद केले.
‘इतिहास बदला, निसर्ग नको’
अरावली ही आपल्या उपखंडातील सर्वात जुनी पर्वतरांग आहे. ‘तुम्हाला इतिहास बदलायचा असेल तर बदला, पण आपल्या उपखंडातील सर्वात जुन्या डोंगररांगांपैकी एक असलेल्या अरावलीला नष्ट करू नका. पर्वत सपाट करण्याची आणि निसर्गाची लूट करण्याची सरकारची ही वृत्ती आपल्या देशासाठी आणि संपूर्ण ग्रहासाठी अत्यंत धोकादायक आहे’, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला.
पर्यावरणासाठी, विशेषत: AQI आणि अरवली टेकड्यांसारख्या मुद्द्यांसाठी लोक बोलत आहेत आणि विरोध करतात हे पाहणे खूप चांगले आहे.
मला भाजप सरकारांचा निसर्गाचा प्रत्येक भाग नष्ट करण्याचा विचित्र ध्यास नाही.
अरवळ हा एक महत्त्वाचा भौगोलिक प्रदेश आहे.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) १८ डिसेंबर २०२५
Comments are closed.