कंट्रोल फीडिंग करायला कबुतरे मिंध्यांचे आमदार आहेत का! आदित्य ठाकरे यांचा टोला

कबुतरांना कंट्रोल फीडिंग करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी पालिकेला दिले आहेत. यावरून शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री आणि मिंध्यांना टोला हाणला. कबुतरांना कंट्रोल फीडिंग करायला कबुतरे मिंध्यांचे आमदार आहेत का, असा सवाल त्यांनी केला. दादरचा कबुतरखाना आहे तिथेच ठेवावा अशी स्थानिकांची भावना असेल तर शिवसेना स्थानिकांसोबत आहे. तो आरे कॉलनी किंवा इतरत्र नेण्यास मात्र शिवसेनेचा विरोध आहे. त्यापेक्षा मंत्री मंगलप्रभात लोढा वरळी सी फेसला बंगला बांधत आहेत तिथे कबुतरखाना करावा, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

Comments are closed.