फेकनाथ मिंधे, भाजपच्या भ्रष्टाचारामुळेच ट्रान्स हार्बर लिंकची वारंवार दुरवस्था! आदित्य ठाकरे यांचा हल्ला

फेकनाथ मिंधे आणि भाजपच्या भ्रष्टाचारामुळे मुंबई ट्रान्स हार्बर लिंकची वारंवार दुरवस्था होत असल्याचा हल्ला शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज केला आहे. जगातील इतर कोणत्याही देशात अशा प्रकारचा भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

‘एमएमआरडीए’ने ‘अटल सेतू’च्या सरफेस दुरुस्तीचा एक व्हिडीओ ‘एक्स’वर शेअर केला आहे. यामध्ये रस्त्याची सरफेसची दुरुस्ती होत आहे. यावरून आदित्य ठाकरे यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. भ्रष्टाचारामुळेच या मार्गाची वारंवार दुरुस्ती करावी लागत असल्याचे त्यांनी ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

g मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अर्थात ‘अटल सेतू’चे काम ‘एमएमआरडीए’च्या माध्यमातून करण्यात आले आहे. हे खाते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीत आहे. गेल्या वर्षी या ‘अटल सेतू’चे लोकार्पण करण्यात आले होते. मात्र लोकार्पणाच्या वर्षभरात रस्त्यावर वारंवार खड्डे पडणे, तडे जाणे, सरफेस खराब होण्याचे प्रकार घडत आहेत.

Comments are closed.