व्हायरल व्हिडीओ गद्दार सेनेचा! बॅगेत आनंदाचा शिधा होता काय? आदित्य ठाकरे यांचा हल्ला

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना प्रसारमाध्यमांनी यासंदर्भात विचारले. शिवसेनेचा आमदार पैशांच्या बंडलांसोबत बसल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे असे पत्रकार म्हणताच, ते शिवसेनेचे नाहीत तर गद्दार टोळीचे आहेत, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

शिवसेना एकच आहे आणि शिवसेनेच्याच नेतृत्वाखालील अधिकृत खात्यावरूनच तो व्हिडीओ ट्विट झाला आहे, असे ते पुढे म्हणाले. प्रचाराच्या नावाखाली हेलिकॉप्टरमध्ये दोन मोठय़ा बॅगा नेण्यात येत होत्या, त्या बॅगांमधून नक्की काय वाटप होत होते त्याचे फुटेज टीव्हीवर दाखवले गेले आहेत, असे सांगतानाच, त्या बॅगांमध्ये आनंदाचा शिधा होता का, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. ‘जो पक्ष स्वतःला ‘न खाता हूं, ना खाने देता हूं’ म्हणतो, तो याच लोकांना संरक्षण का देतो? त्यांच्यावर कारवाई का होत नाही?’ असा सवाल करत त्यांनी भाजपवरही निशाणा साधला.

Comments are closed.