निवडणूक आयोगाच्या देशद्रोही कृत्यांचे लवकरच गौप्यस्फोट… आदित्य ठाकरे यांचा इशारा

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगाची देशद्रोही कृत्ये लवकरच जगासमोर आणणार आहेत. आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत ”निवडणूक आयोगाच्या देशद्रोही कृत्यांचे गौप्यस्फोट पुढच्या काही दिवसात आम्ही करणार आहोत”, असा इशारा ट्विटरवरून दिला आहे.

शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने महापालिकेतील मध्यवर्ती निवडणूक यंत्रणेकडून रीतसर शुल्क भरून प्रारूप मतदार यादी घेतली होती. त्या यादीवर तारिख 14 नोव्हेंबरची आहे. तर सर्वांसाठी प्रदर्शित झालेली यादी ही 20 नोव्हेंबरला प्रदर्शित झाली आहे. या यादिवरील तारखांच्या तसेच प्रदर्शनातील गोंधळावरून आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला फटकारले आहे.

”हा गोंधळ नव्हे तर गुन्हाच आहे देशद्रोहाचा! काल आमच्या एका पदाधिकाऱ्याने प्रारूप मतदार यादी महापालिकेतील मध्यवर्ती निवडणूक यंत्रणेकडून रीतसर शुल्क भरून घेतली, ही सर्वांनाच मिळते.पण या यादीवरची तारीख बघा… १४ नोव्हेंबर २०२५. यादी सर्वांसाठी खरी ऑनलाईन प्रकाशित झाली २० नोव्हेंबर २०२५ रोजी! सुरुवातीला यादी येणार होती ७ नोव्हेंबरला, मग १४ आणि शेवटी प्रकाशित झाली २० नोव्हेंबर रोजी”, असे आदित्य ठाकरे यांनी या ट्विटमध्ये नमूद केले.

यावरून आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला काही प्रश्न विचारले असून येत्या काही दिवसात निवडणूक आयोगाच्या आणखी काही देशद्रोही कृत्यांचे गौप्यस्फोटकरणार असल्याचा इशारा दिला आहे.

आदित्य ठाकरे यांचे निवडणूक आयोगाला प्रश्न

– मग १४ तारखेला जी प्रारूप मतदार यादी तयार होती, ती कोणाला दिली?

– काही ठराविक लोकांनाच दिली का?

– बाकीच्यांना ही यादी देण्यासाठी दिरंगाई का?

– की यादीमध्ये काही गडबड करायची होती म्हणून तुम्ही थांबलात?

– कोणाच्या आदेशाची वाट पाहत होतात?

– ही यादी मशीन रिडेबल का नाही?

– तुमचा देशद्रोह पकडला जाईल म्हणून…?

Comments are closed.