भाजपच्या फायद्यासाठी काम करणाऱ्या निवडणूक आयोगाला नियमांनुसार काम करण्यास भाग पाडले पाहिजे – आदित्य ठाकरे
भारतामध्ये निष्पक्ष निवडणुका न घेता भाजपच्या फायद्यासाठी काम करणाऱ्या निवडणूक आयोगाला नियमांनुसार काम करण्यास भाग पाडले पाहिजे, असं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. X वर एक पोस्ट करत त्यांनी मतचोरी आणि निवडणूक मतदान यादीतील गैरकारावरून निवडणूक आयोग आणि भाजपवर टीका केली आहे.
X वर पोस्ट करत आदित्य ठाकरे म्हणाले आहेत की, “हिंदुस्थानातील निवडणुका या निवडणूक आयोगाने स्वतंत्र आणि निष्पक्ष पद्धतीने घेतलेल्या नाहीत, याविषयी आपण सातत्याने बोलतोय. निवडणूक आयोगाने मतदार यादीची योग्य तपासणी न केल्याने निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाले आहेत. काल आम्ही वरळी येथे बोगस मतदारांची पोलखोल केली. निवडणुकीनंतर केलेल्या अभ्यासात १९,३३३ मतदार बोगस आढळले. हे माझ्या मतदारसंघातील वास्तव असेल, तर राज्यभर सत्ताधाऱ्यांनी केलेली मतदार फसवणूक किती मोठी असेल, याची फक्त कल्पना करा.”
ते पुढे म्हणाले, “मी आमच्या पदाधिकाऱ्यांना मतदार यादींचे सविस्तर परीक्षण करण्याचे, गैरप्रकार उघड करण्याचे आणि आक्षेप नोंदवण्याचे आवाहन केले आहे. हिंदुस्थानात निष्पक्ष निवडणुका न घेता भाजपच्या फायद्यासाठी काम करणाऱ्या निवडणूक आयोगाला नियमांनुसार काम करण्यास भाग पाडले पाहिजे आणि लोकशाही पुन्हा सक्षम केली पाहिजे.”
भारतातील निवडणुका ह्या भारतीय निवडणूक आयोगाने स्वतंत्र आणि निष्पक्ष पद्धतीने घेतलेल्या नाहीत, ह्याविषयी आपण सातत्याने बोलतोय.
निवडणूक आयोगाने मतदार यादीची योग्य तपासणी न केल्याने निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाले आहेत.
काल आम्ही वरळी येथे बोगस मतदारांची पोलखोल… pic.twitter.com/0nRILlzrvT
— Aaditya Thackeray (@AUThackeray) 28 ऑक्टोबर 2025
Comments are closed.