शिवस्मारकाच्या कामाचं काहीही चिन्ह नाही, हे दुर्दैवी आहे- आदित्य ठाकरे
छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील सुशोभीकरणाच्या कामांचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, , आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते नारळ वाढवून सुरुवात करण्यात आली. यानंतर आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील पुतळ्याच्या कामावरून राज्य सरकार व मोदी सरकारवर टीका केली.
”आता शिवस्मारकाच्या कामाचं चिन्ह कुठेही दिसत नाही. असंच महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचंही आहे. 2017 साली निवडणूकीआधी या सरकारने घाई घाईत पंतप्रधान नरेंद्र मोदींना मुंबईत बोलावून शिवस्मारकाच्या कामाचे जल पूजन व आंबेडकरांच्या स्मारकाचे भूमीपूजन केलं होतं. आता या दोघांपैकी एकही काम पूर्ण झालेलं नाही हे दुर्दैव आहे”, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका केली.
Comments are closed.