चुकीच्या पद्धतीने जीएसटी लागू करूनही जाहिरातबाजी, आदित्य ठाकरे यांचा टोला

केंद्र सरकारने चुकीचा निर्णय दुरुस्त केला. मात्र, याप्रकरणी माफी मागण्याऐवजी जीएसटी सुधारणांना जनतेसाठी मोठी भेट म्हणून समोर करत आहेत, अतिशय उद्दामपणे उलट जाहिरातबाजी करत आहेत, अशा शब्दांत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मोदी सरकारला एक्सवरून जोरदार टोला लगावत जीएसटी धोरणातील त्रुटींवर बोट ठेवले आहे.

केंद्र सरकारने जीएसटीची चुकीची पद्धत लागू केली. आता याची दुरुस्ती केल्यानंतर कोटय़वधी रुपये खर्चून जीएसटी सुधारणा ही जनतेसाठी मोठी भेट असल्याची जाहिरातबाजी करण्यात येत आहे. चूक दुरुस्त करूनही त्यासाठी माफी मागितली जात नाही. उलट उद्दामपणे त्याला भेट म्हणून सादर केले जात आहे, हे अत्यंत हास्यास्पद आहे, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. आता तरी केंद्र सरकारने भेदभाव न करता राज्यांना त्यांची थकबाकी वेळेवर द्यावी, अशी अपेक्षा आहे, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

Comments are closed.