Happy Friendship Day… युती धर्माच्या हतबलतेमुळे शिरसाटांना अर्थ खातं मिळणारच, मुख्यमंत्र्यांना टॅग करत आदित्य ठाकरे यांचा चिमटा

वसतीगृहासाठी वाटेल तितके पैसे मागा, मी देतो… आपलं काय जातंय, सरकारचा पैसा आहे…. असे वादग्रस्त विधान करणारे महायुती सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यावर सध्या मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. काहि दिवसांपूर्वी विधानभवनात रमी खेळणारे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे कृषी खाते काढून घेत त्यांना क्रीडा खाते देण्यात आले. या दोन्ही घटनांवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारला जोरदार चिमटा काढला आहे.

आदित्य ठाकरे यांनी संजय शिरसाट यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ शेअर करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. ”हॅपी फ्रेंडशिप डे CMO MAHARASHTRA… असे दोस्त असताना… बरं, आता रमी खेळणाऱ्यांना क्रीडा खाते मिळतं, युती धर्माच्या हतबलतेमुळे, तर यांना अर्थ खाते मिळणारच”, असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

राज्यातील मंत्र्यांचे कारनामे सध्या राज्यभरात गाजतआहेत. माजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमीचा डाव, विधानभवनातील आमदार समर्थकांची हाणामारी, आमदार संजय गायकवाड यांची कॅन्टीन चालकाला मारहाण ही प्रकरण सध्या गाजत आहेत. यावरुन सध्या महायुती सरकारवर जोरदार टीका होत आहे.

Comments are closed.