Aaditya Thackeray will not meet Sharad Pawar Even going to Delhi


नवी दिल्ली : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कारा’ने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. मंगळवारी (ता. 11 फेब्रुवारी) दिल्लीत हा कार्यक्रम पार पडला. पण यामुळे आता महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे. कारण दिल्लीत असूनही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवानेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेणार नसल्याचे सांगितले आहे. कोणी कोणाचे कौतुक करावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, परंतु महाराष्ट्राशी गद्दारी करणाऱ्यांचे आम्ही कौतुक करणार नाही, असे आदित्य ठाकरे यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. दिल्लीत असलेल्या आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती दिली आहे. (Aaditya Thackeray will not meet Sharad Pawar Even going to Delhi)

शिवसेना ठाकरे गटाचे युवानेते, आमदार यांनी गुरुवारी (ता. 13 फेब्रुवारी) दिल्लीतून प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, काल बुधवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली आणि आता आपचे नेते अरविंद केजरीवाल यांची भेट घेणार आहोत. महाराष्ट्र आणि दिल्लीच्या निवडणुका झाल्या. दोन्ही निवडणुकींमध्ये एक साम्य आहे. जे कोणी जिंकले आहे, त्यात निवडणूक आयोगाचा मोठा हात आहे. निवडणूक आयोगाचे आभार मानताना भाजपाच्यावतीने आम्ही ही चर्चा करतोय, निवडणुकीत घोटाळा झाला आहे, ते जगासमोर आणणे गरजेचे आहे असे ठाकरेंनी सांगितले. परंतु, यावेळी त्यांना शरद पवारांची भेट घेणार का? असे विचारण्यात आले. तर त्यांनी थेटपणे नाही असे उत्तर दिले.

हेही वाचा… Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या मागचा शुक्लकाष्ठ संपता संपेना! पत्नीने दिलेल्या ‘त्या’ तक्रारीवरून न्यायालयाचा झटका

यावेळी त्यांनी शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांचे जे कौतुक केले, त्याबाबत भाष्य करत म्हटले की, कोणी कोणाचे कौतुक करावे हा त्यांचा विषय आहे. संजय राऊत यांनी काल यावर उत्तर दिले आहे. एकनाथ शिंदे यांनी आमच्याबरोबरच नाही, महाराष्ट्राबरोबर गद्दारी केली. अनेक लोक पक्ष फोडतात, पण राग या गोष्टीचा आहे की, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडण्याच पाप केले. त्यांनी दिलेले नाव, चिन्ह चोरण्याचे पाप केले. त्यापुढे जाऊन एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात सुख, शांती, समृद्धी आणण्यासाठी आम्ही जे करार केले होते, ते सगळे प्रकल्प दुसऱ्या राज्यात पाठवण्याच पाप एकनाथ शिंदे यांनी केले, असे यावेळी आदित्य ठाकरेंनी म्हटले.

तर, आम्ही मागच्या महिन्यात शरद पवारांना भेटलो. आम्ही त्यांना नेहमी भेटत असतो. तर आम्ही ज्या कोणाला भेटतो, त्यांना आम्ही का भेटतो, हे स्पष्टपणे सांगत असतो, असे यावेळी आदित्य ठाकरेंनी सांगितले. तसेच, जे पळून जात आहेत, ते जय महाराष्ट्र करत नाहीत, जय गुजरात करत जात आहेत. चौकशीला घाबरून जात आहेत. त्यामुळे ते जय महाराष्ट्र म्हणू शकत नाहीत. त्याशिवाय, आम्ही विकासाला दूर करण्यासाठी कौतुक केले नाही. जे महाराष्ट्राला लुटतात, पक्ष फोडतात, कुटुंब फोडतात आम्ही त्यांचे कधीच कौतुक करणार नाही, असेही यावेळी आदित्य ठाकरेंकडून स्पष्टपणे सांगण्यात आले.



Source link

Comments are closed.