अजित पवार यांच्या अपघाताचा अंतिम अहवाल जानेवारीपूर्वी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतील विमान अपघाताचा तपास ‘एएआयबी’कडून सुरू आहे. आंतरराष्ट्रीय तज्ञ तसेच आंतरराष्ट्रीय संस्था यांचाही यात समावेश आहे. राज्य सीआयडीकडूनही या प्रकरणाचा तपास सुरू आहे. विमान अपघाताबाबत ‘एएआयबी’चा अंतिम अहवाल जानेवारी महिन्यापूर्वी येईल. त्यानंतरच सीबीआय या दुर्घटनेचा तपास हाती घेऊ शकेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेचा दोन प्रकारे तपास चालला आहे. एक आपली सीआयडी करते आहे. दुसरी एएआयबी करते आहे. आपण सीबीआयला विनंती केली होती, पण त्यांनी एएआयबीचा अंतिम अहवाल आल्याशिवाय आपण तपास सुरू करू शकत नाही, असे स्पष्ट केले आहे.

पायलट सुमित कपूर यांच्याबाबत आधी शंका होती. पण त्यांचे बँक खाते आदी सर्व आर्थिक व्यवहार तपासले, पण त्यात काही संशयास्पद आढळले नाही. एएआयबीचा प्राथमिक अहवाल आला आहे. मी आज केंद्र सरकारशी चर्चा केली. मंत्रीमहोदयांनाही विचारले. जानेवारीपूर्वी अंतिम अहवाल येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Comments are closed.