आजच्या ताज्या बातम्या 30 जून: एका क्लिकवर वाचा दिवसभरातील सर्व मोठ्या बातम्या

ब्रेकिंग न्यूज टुडे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सर्व केंद्रीय विभागांच्या सचिवांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेणार आहेत. या उच्चस्तरीय बैठकीत प्रशासकीय सुधारणांच्या प्रगतीचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच, व्यवसाय करण्याची सुलभता आणि राहणीमान सुलभ करण्यासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा केली जाईल. सुशासन, कार्यक्षमता आणि सार्वजनिक सेवा अधिक प्रभावी करण्यावरही बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
Comments are closed.