यशस्वी ज्या प्रमाणं खेळतोय, ते पाहता भारताच्या वर्ल्ड कप संघात घ्यायला पाहिजे होतं:आकाश चोप्रा

नवी दिल्ली : भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रानं आगामी टी 20  वर्ल्ड कपसाठी भारताच्या संघात यशस्वी जयस्वालला संधी न दिल्यानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. चोप्रानं म्हटलं विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या सारख्या वरिष्ठ खेळाडूंनी निवृत्ती घेतल्यानंतर यशस्वी जयस्वालला राष्ट्रीय संघाचा मार्ग खुला होईल, असं मानलं जात होतं. मात्र, रोहित आणि विराटच्या निवृत्तीनंतर भारतीय क्रिकेटमध्ये संघ निवडीचं चित्र गुंतागुंतीचं बनलंय, असं आकाश चोप्रानं म्हटलं.

आकाश चोप्रा काय म्हणाला?

आकाश चोप्रानं 2024 च्या टी 20 वर्ल्ड कप विजेत्या संघात यशस्वी जयस्वाल होता. मात्र,  संघ व्यवस्थापनामुळं त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी देण्यात आली नव्हती. 2024 च्या टी 20 वर्ल्ड कपपूर्वी यशस्वी जयस्वालनं टी 20 मध्ये शतक केलं होतं.  कसोटी, वनडे आणि टी 20 क्रिकेटमध्ये भारताकडून शतक करणाऱ्या मोजक्या खेळाडूंमध्ये  यशस्वी जयस्वालचा समावेश होतो.  त्यानं टी  20 मध्ये 723 धावा केल्या आहेत, त्याची सरासरी 36.15 आणि स्ट्राईक रेट 164.31 इतकं राहिलं आहे.

आकाश चोप्रानं त्याच्या यूट्यूबवर म्हटलं की ज्या प्रकारे यशस्वी जयस्वाल खेळतो, तर्कानुसार त्याला टीममध्ये पहिल्यांदा संधी मिळाली पाहिजे होती.  2024 टी 20 वर्ल्ड कप संघाचा भाग होता, मात्र त्याला खेळायला संधी मिळाली नाही करण त्यावेळी संघात जागा नव्हती.  भारताच्या केवळ सहा खेळाडूंनी  तीन फॉरमॅटमध्ये शतक केलं आहे, त्यात यशस्वी जयस्वालचा समावेश आहे.

आकाश चोप्रानं म्हटलं  की टी 20 संघात निवडीसाठी यशस्वी जयस्वालचं नाव आघाडीवर असल्याचं मानलं जायचं. मात्र, याच वेळी अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन या दोघांनी डावाची सुरुवात केली, त्यांनी चांगली कामगिरी केली. त्यानंतर आता यशस्वी जयस्वालसाठी जागा नाही असं तुम्हाला वाटतं. यानंतर जेव्हा सलामीचा पर्याय समोर आला तेव्हा भारतानं शुभमन गिलला निवडलं, असं आकाश चोप्रा म्हणाले.

संजू सॅमसन  पहिली पसंतीचा विकेटकीपर- सलामीवीर झाल्यानं आता भारताला बॅकअप विकेटकीपरची आवश्यकता आहे. ज्यामुळं यशस्वी जयस्वालची दावेदारी कमजोर झाली. संघाचं संतुलन कायम राखण्यासाठी निवड समितीला जयस्वालचं संघातील स्थान आणखी कमजोर झालं.

आगामी आयपीएल यशस्वी जयस्वालसाठी महत्त्वाचं असल्याचं आकाश चोप्रानं म्हटलं.  2023 पासून सातत्यानं धावा करणाऱ्या यशस्वी जयस्वालबाबत सहानुभूती वाटते असं आकाश चोप्रानं म्हटलं. भारतीय संघात यशस्वी जयस्वालच्या जागी ईशान किशनला संधी मिळाल्याचं आकाश चोप्रानं म्हटलं.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.