गुजरातमध्ये आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे
मोठ्या नेत्याने सोडली पक्षाची साथ
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
गुजरातमध्ये आम आदमी पक्षाला मोठा झटका बसला आहे. पक्षाचा मोठा चेहरा आणि शेतकरी शाखेचे प्रमुख राजूभाई करपडा यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आम आदमी पक्ष गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी करत असताना आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यांना प्रामुख्याने उपसिथत करत स्वत:चा जनाधार वाढविण्याचा प्रयत्न करत असताना पक्षाला हा झटका बसला आहे.
मूळचे सुरेंद्र नगर जिल्ह्याचे असलेले राजूभाई हे शेतकरी आंदोलनामुळे चर्चेत आले होते. राजूभाई आता भाजपमध्ये सामील होणार असल्याचा कयास वर्तविला जात आहे. वैयक्तिक कारणांमुळे पक्ष सोडत असल्याचे राजूभाई यांनी अरविंद केजरीवालांना पाठविलेल्या राजीनामा पत्रात नमूद पेले आहे. करपडा हे केवळ आम आदमी पक्षाच्या शेतकरी शाखेचे प्रमुख नव्हते, तर त्यांची गणना राज्यातील पक्षाच्या प्रमुख नेत्यांमध्ये केली जात होती.
Comments are closed.