आमिर खान लव्ह जिहादचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर; मिस्टर परफेक्शनिस्टच्या लग्नावर नितेश राणेंची टीका

आमिर खानच्या तिसऱ्या लग्नावर नितेश राणे: काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिर खान यानं आपलं तिसरं लग्न उरकलं. त्याची प्रेयसी गौरी स्प्रॅट हिच्यासोबत वयाची साठी ओलांडलेल्या आमिर खाननं आपली लग्नगाठ बांधली. गौरीसोबतच्या लग्नापूर्वी आमिर खानची दोन लग्न झालेली आणि त्या दोन्ही लग्नांचा काडीमोडही झालाय. आमिरला आधीच्या दोन लग्नांपासून तीन मुलं आहेत, तर गौरीला आधीच्या लग्नापासून एक मुलगा आहे. आमिर खाननं अगदी घरगुती समारंभात आपली लग्नगाठ बांधली. अशातच आता मंत्री नितेश राणे यांनी तिसऱ्या लग्नावरुन अभिनेता आमिर खानवर टीकास्त्र डागलंय. आमिर खानबाबत बोलताना नितेश राणे यांनी आमिर खानला ‘लव्ह जिहादचा ब्रँड अॅम्बेसेडर’, असं संबोधलं आहे. तसेच, आमिर खानच्या सिनेमांवर बहिष्कार टाकण्याचं आवाहनसुद्धा केलंय.

बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या तिसऱ्या लग्नावरुन बोलताना नितेश राणे यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. तसेच, आमिर खानवरुन बोलताना त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. जे सध्या चर्चेत आहे.

आमिर खानबाबत नितेश राणे नेमकं काय म्हणाले? (Aamir Khan On Nitesh Rane)

आमिरबद्दल बोलताना नितेश राणे म्हणाले की, “जेव्हा अशाकाही गोष्टी समाजात घडतात, तेव्हा अशा पद्धतीच्या लोकांकडे ‘लव्ह जिहादचे ब्रँड अॅम्बेसेडर’ म्हणून पाहायचं का? असा प्रश्न पडतो. म्हणून याबाबतीत मी माझ्या समस्त हिंदु समाजाला सांगू इच्छितो की, या बाबतीत तुम्ही सावधान राहावं, अशा पद्धतीचे ब्रँड अॅम्बेसेडर कुठेही दिसले, तरी यांच्या येणाऱ्या काळात सिनेमे पाहायचे का? याहीबद्दल विचार करावा आणि त्यांच्या सिनेमांवर बहिष्कार टाकावा…”

“जेव्हा सेलिब्रिटी आपल्या वैयक्तिक आयुष्यात असे निर्णय घेतात, तेव्हा हिंदू समाजानं त्यावर विचार केला पाहिजे. लव्ह जिहादचा ब्रँड ॲम्बेसेडर कोण? आमिर खान तसा बनत नाहीये का? जे हिंदू तरुण त्याचे सिनेमे पाहतात, त्यांनी अशा नटांना मोठं करण्यापूर्वी गांभीर्यानं विचार केला पाहिजे. जे लोक अशा व्यक्तींना आपले आदर्श किंवा सेलिब्रिटी मानतात, त्यांनी आपली मानसिकता तपासायची गरज आहे. हिंदू समाजानं अशा लोकांचे चित्रपट पाहायचे की नाही, यावर आत्मपरीक्षण करावं…”, असंही नितेश राणे म्हणालेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Neeta Ambani Talks In Marathi At Ajay Atul Live Show: अजय-अतुलच्या कॉन्सर्टमध्ये नीता अंबानींची एन्ट्री, प्रेक्षकानं डिवचताच अस्खलित मराठीत उत्तर दिलं, एकाच वाक्यानं टाळ्यांचा कडकडाट, VIDEO

Comments are closed.