सिनेमाच्या जन्माची कथा मोठ्या पडद्यावर, दादासाहेब फाळके यांच्यावर बायोपिक आमीर खान साकारणार भूमिका

हिंदुस्थानच्या सिनेसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या जीवनावर आता बायोपिक येतोय. या सिनेमामध्ये अभिनेता आमीर खान फाळकेंची भूमिका साकारणार आहे, तर सिनेमाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी करणार आहे.

सिनेमाच्या जन्माची कथा आता सिनेमाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर उलगडली जाणार आहे. हा चित्रपट स्वातंत्र्य लढाच्या पार्श्वभूमीवर घडणारी एक गोष्टीवर आधारित असेल. सिनेमात एका कलाकाराची विलक्षण संघर्षमय कहाणी पाहता येणार आहे. ज्यांनी शून्यातून सुरुवात करून जगातील सर्वात मोठ्या स्थानिक चित्रपटसृष्टीची पायाभरणी केली.

लेखक दिग्दर्शक परेश मोकाशी यांचा ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ हा चित्रपट दादासाहेब फाळके यांच्या जीवनावर आधारित होता. या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. आता दादासाहेबांचा जीवनप्रवास हिंदीमध्ये मोठ्या पडद्यावर येईल. त्यासाठी दिग्दर्शक राजकुमार हिरांनी यांनी पुढाकार घेतला आहे. चित्रपटाचे शूटिंग ऑक्टोबर 2025 पासून सुरू होणार आहे.

Comments are closed.