भराडी देवीची यात्रा 9 फेब्रुवारीला
दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱया मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेचा वार्षिक यात्रोत्सव सोमवार दि. 9 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे. आज सकाळी धार्मिक परंपरा जोपासत आंगणे ग्रामस्थांनी देवीला कौल लावून यात्रेची तिथी निश्चित केली.
5 डिसेंबरपर्यंत मंदिर बंद
कौल लागल्यानंतर धार्मिक विधीसाठी श्री देवी भराडी मंदिर 5 डिसेंबर 2025 पर्यंत बंद राहणार आहे. या काळात कुणालाही देवळात प्रवेश दिला जाणार नाही, असे सांगण्यात आले.
Comments are closed.