AAP ने आसाममध्ये 14 उमेदवारांची घोषणा केली

केजरीवाल यांचा पक्ष विधानसभा निवडणूक लढवणार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

2026 च्या आसाम विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा सुरू झाली आहे. आम आदमी पक्षाने (आप) उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत 14 उमेदवारांची घोषणा केली आहे. आसाम विधानसभेसाठी 9 एप्रिल रोजी मतदान होणार असून त्यात अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाने निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. आम आदमी पक्षापूर्वी, काँग्रेस पक्षाने 23 उमेदवारांची दुसरी यादीही जाहीर केली आहे. या यादीत काँग्रेसचे माजी खासदार अब्दुल खालेक यांच्यासह राज्यातील अनेक प्रमुख नेत्यांची नावे आहेत. दुसरा प्रमुख राजकीय पक्ष भाजप, आपल्या उमेदवारांची घोषणा कधी करतो हे पाहणे बाकी आहे. 126 जागांच्या आसाम विधानसभेत सध्या भाजपची सत्ता आहे. येथे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा हे सलग दुसऱ्यांदा कार्यकाळ बजावत आहेत. दरम्यान, काँग्रेस पक्ष आगामी निवडणुकीत आसाममध्ये सत्तेवर लक्ष ठेवून राज्यात आपली पकड मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

Comments are closed.