आपचे खासदार संजय सिंह बिहारमध्ये 'खान सर' भेटले
पाटणा :
बिहारची राजधानी पाटणा येथील प्रसिद्ध ‘खान सर’ पुन्हा चर्चेत आले आहेत. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी त्यांची भेट घेतली आहे. बिहार विधानसभा निवडणूक तोंडावर असताना झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना ऊत आला आहे. आम आदमी पक्ष बिहारमधील सर्व 243 जागा लढविणार आहे. संजय सिंह यांनी खान सर यांच्या कोचिंग सेंटरमध्ये जात भेट घेतली आहे. दोघांदरम्यान बिहारच्या शिक्षणव्यवस्थेवरून चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. तर खान सर राजकारणात पाऊल ठेवणार असल्याची आणि आम आदमी पक्ष त्यांना उमेदवारी देणार असल्याची चर्चा आहे. फैजल खान उर्फ खान सर हे स्वत:च्या शिकविण्याच्या शैलीमुळे स्पर्धा परीक्षा उमेदवारांदरम्यान अत्यंत लोकप्रिय आहेत. चालू वर्षी पाटण्यात बिहार लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत उमेदवारांनी आंदोलन केले होते. या आंदोलनात खान सरांची सक्रीय भूमिका होती. खान सर मूळचे उत्तरप्रदेशच्या देवरियाचे रहिवासी आहेत. उच्चशिक्षणासाठी पाटण्यात आल्यावर ते येथेच स्थायिक झाले. पाटणा येथे त्यांचे कोचिंग सेंटर आहे.
Comments are closed.