चंदीगडच्या महापौरपदाच्या निवडणुकीपूर्वी 'आप'ला मोठा धक्का बसला आहे
दोन नगरसेविका भाजपमध्ये सामील
वृत्तसंस्था/ चंदीगड
चंदीगड महापौर निवडणुकीपूर्वी मोठा राजकीय उलटफेर झाला आहे. आम आदमी पक्षाच्या नगरसेविका सुमन आणि पूनम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. महापौर हरप्रीत कौर बबला आणि वरिष्ठ नेते संजय टंडन यांच्या उपस्थितीत दोन्ही नगरसेविकांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले आहे. महापौर निवडणुकीत विजयासाठी भाजपला 19 नगरसेवकांचे संख्याबळ आवश्यक होते. वर्तमान काणत भाजपचे 16, आम आदमी पक्षाचे 13 तर काँग्रेसचे 6 नगरसेवक आहेत. याचबरोबर एका खासदाराचे मतही काँग्रेसचे आहे. महापौर निवडून आणण्यासाठी 19 मते आवश्यक होती. आम आदमी पक्षाच्या दोन नगरसेविकांच्या पक्षांतरामुळे तेथील राजकीय समीकरणे बदलली आहेत. आता भाजपचे 18, आम आदमी पक्षाकडे 11 तर काँग्रेसकडे 6 नगरसेवकांचे आणि एक खासदाराचे मत आहे. अशास्थितीत भाजपला केवळ आता एका मताची जुळवाजुळव करावी लागणार आहे. पूनम आणि सुमन या पूर्वी भाजपमध्येच होत्या. त्यामुळे त्यांनी पक्षप्रवेशाला घरवापसी संबोधिले आहे.
Comments are closed.