Rohit Sharma Retirement – त्याने का निवृत्ती घ्यावी? रोहित शर्मासाठी मिस्टर 360 ची बॅटिंग

Champions Trophy 2025 च्या अंतिम सामन्यात कर्णधार रोहित शर्माने न्यूझीलंडविरुद्ध ताबडतोब फलंदाजी करत 76 धावांची सलामी दिली. त्यामुळे संघाला याचा चांगलाच फायदा झाला. त्यानंतर आलेल्या फलंदाजांनी तीच लय कायम ठेवत संघाचा विजय निश्चित केला आणि हिंदुस्थानने चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावली. ऐकीकडे संघाच्या विजायाच जल्लोष सुरू होता तर, दुसरीकडे रोहित शर्माच्या निवृत्ती संदर्भात चर्चांना उधान आले होते. त्यानंतर रोहित शर्माने निवृत्ती घेणार नसल्याचे जाहीर केले होते. आता दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्स रोहितच्या बाजूने मैदानात उतरला असून, त्याने का निवृत्ती घ्यावी? असा थेट सवाल त्याने केला आहे.
एका युट्यूब चॅननला दिलेल्या मुलाखतीमध्ये डिव्हिलियर्स म्हणाला की, त्याने का निवृत्ती घ्यावी? एक फलंदाज आणि कर्णधार म्हणून त्याने अनेक विक्रम केले आहेत. फायनलमध्ये त्याने केलेल्या 76 धावांमुळे संघाची चांगली सुरुवात झाली. दबाव असताना त्याने यशाचा पाया रचला आणि संघाचे नेतृत्व केले. रोहित शर्माकडे निवृत्त होण्याचे कोणतेही कारण नाही. इतर कर्णधारांच्या तुलनेत, रोहितच्या नेतृत्वात संघाच्या विजयाची टक्केवारी पहा, ती जवळजवळ 74 टक्के आहे. इतर माजी कर्णधारांपेक्षा ती खूपच चांगली आहे. त्याचा खेळ असाच राहिला तर वनडेमधील सर्वोत्तम कर्णधारांमध्ये त्याचा समावेश होईल. तसेच खुद्द रोहितने निवृत्त होणार नसल्याचे म्हटले आहे, त्यामुळे अफवा थांबवा, असे डिव्हिलियर्स म्हणाला आहे.
Comments are closed.