एबी डिविलियर्सने गौतम गंभीरला दिला मोठा सल्ला, म्हणाला….

विश्व क्रिकेटमध्ये ‘मिस्टर 360 डिग्री’ या नावाने प्रसिद्ध असलेले दक्षिण आफ्रिकेचे माजी महान फलंदाज एबी डिव्हिलियर्स यांनी भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना एक मोठा सल्ला दिला आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धची एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर गौतम गंभीर यांनी म्हटले होते की, एकदिवसीय फॉर्मेटमध्ये फलंदाजीच्या क्रमाला (बॅटिंग ऑर्डर) गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिले जाते. यावर आता एबी डिव्हिलियर्स यांनी आपले उत्तर दिले आहे.

एबी डिव्हिलियर्स यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, “मी काही अंशी त्यांच्याशी सहमत आहे. मला एकदिवसीय सामन्यांमध्ये फलंदाजांच्या क्रमामध्‍ये बदल करायला नेहमी आवडले आहे, पण हा एक नाजुक मुद्दा आहे. कारण तुम्ही खेळाडूंच्या भूमिकांशी जास्त छेडछाड करू शकत नाही.” “यात पहिले तीन फलंदाज, नंतर चार ते सहा क्रमांकाचे फलंदाज आणि त्यानंतर खालच्या फळीतील फलंदाज असे विभाग येतात. हे जवळपास तीन खंडांसारखे आहे आणि तुम्ही खरोखरच यात रचनात्मक होऊ शकता.” “उजव्या आणि डावख्या हाताच्या फलंदाजांचे संयोजन (कॉम्बिनेशन) तयार करण्यासाठी तसेच खेळाच्या काही विशिष्ट परिस्थितीनुसार बदल करणे योग्य आहे.”

टीम इंडियाने टी20 मालिकेची सुरुवातही विजयाने केली आहे. भारताने कटक येथे झालेल्या पहिल्या टी20 सामन्यात 101 धावांनी मोठा विजय नोंदवला. डिव्हिलियर्स यांनी भारतीय संघाचे जोरदार कौतुक करत म्हटले, “विशेषतः टी20 फॉर्मेटमध्ये भारताचे प्रदर्शन अविश्वसनीय राहिले आहे. तिन्ही फॉर्मेटपैकी टी20 हा सर्वात अस्थिर (Unstable) फॉर्मेट आहे आणि अशातही आपल्या प्रदर्शनात सातत्य (Consistency) राखणे, याचा अर्थ संघ योग्य दिशेने पुढे जात आहे.” “मला वाटते की याचा संबंध भारतीय क्रिकेटमधील खोलीशी आहे.”

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना आज (गुरुवार, 11 डिसेंबर) न्यू चंदीगढमधील मुल्लांपूर येथे खेळला जाईल. भारतीय संघ या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. भारतीय संघाने कटक येथे झालेल्या पहिल्या टी20 सामन्यात 101 धावांनी मोठा विजय मिळवला होता. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेने कसोटी मालिकेत भारताला क्लीन स्वीप केले होते. त्यानंतर टीम इंडियाने 2-1 अशा फरकाने एकदिवसीय (वनडे) मालिका आपल्या नावावर केली.

Comments are closed.