IPL: विराट कोहली नव्हे, 'या' दिग्गजाच्या नावावर IPL मध्ये सर्वाधिक 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्कार!

यंदाच्या 18व्या आयपीएल हंगामाची चाहते नक्कीच आतुरतेने वाट पाहत असतील. या मेगा टी20 लीगचा हा हंगाम (22 मार्च) पासून सुरू होणार आहे. त्यासाठी सर्व संघ सज्ज झाले आहेत. आयपीएलने आतापर्यंत 17 वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे. या काळात अनेक रेकाॅर्ड झाले. या रेकाॅर्डच्या यादीत मॅचविनिंग खेळाडूंचीही एक मोठी यादी आहे. या लीगमध्ये असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांनी सामनावीराचा पुरस्कार पटकावला आहे. या यादीत दिग्गजांची नावे आहेत. यादीत विराट कोहलीचे नाव देखील समाविष्ट आहे. पण तो टॉप-3 मध्ये नाही. या बातमीद्वारे आपण आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकणाऱ्या 3 खेळाडूंबद्दल जाणून घेऊया.

1) एबी डिव्हिलियर्स 25 वेळा- दक्षिण आफ्रिकेचा माजी महान फलंदाज एबी डिव्हिलियर्सचा (Ab De Villiers) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक जबरदस्त दर्जा आहे. त्याने आयपीएलमध्येही अशीच कामगिरी केली. हा दिग्गज गेल्या अनेक वर्षांपासून या मेगा टी20 लीगमध्ये खेळत आहे. जिथे त्याने आरसीबीसोबत बराच काळ घालवला. या काळात, एबीने 2008 ते 2021 पर्यंत 184 सामने खेळले. ज्यामध्ये तो जास्तीत जास्त 25 वेळा सामनावीराचा पुरस्कार पटकावण्यात यशस्वी ठरला.

2) ख्रिस गेल 22 वेळा- टी20 क्रिकेटमध्ये युनिव्हर्सल बॉल म्हणून नाव कमावलेला माजी कॅरिबियन दिग्गज ख्रिस गेल एक जबरदस्त स्टार आहे. त्याने या फॉरमॅटमध्ये प्रचंड यश मिळवले आहे. गेलने आपल्या कारकिर्दीत आयपीएलमध्येही दीर्घ कारकिर्द गाजवली. गेल आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब, कोलकाता नाईट रायडर्स, आरसीबी आणि पंजाब किंग्जकडून खेळला. जिथे त्याने 2009 ते 2021 पर्यंत एकूण 142 सामने खेळले. दरम्यान त्याने 22 वेळा सामनावीर पुरस्कार पटकावला.

3) रोहित शर्मा 19 वेळा- भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात दिग्गज सलामीवीर फलंदाजांपैकी एक आहे. हा स्टार फलंदाज आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून खेळत आहे. रोहित शर्माने 2008 मध्ये डेक्कन चार्जर्सकडून आयपीएल कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर तो मुंबई इंडियन्सचा भाग बनला आणि अजूनही त्याच संघाकडून खेळत आहे. त्याने या लीगमध्ये 257 सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने त्याने 19 वेळा सामनावीर पुरस्कार पटकावला.

Comments are closed.