अभिजीत बिचुकले बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लढवणार, सुनेत्रा पवार यांना आव्हान देणार
अभिजीत बिचुकले सातारा : बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बारामती विधानसभेची जागा दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळं रिक्त झालं होतं. त्या ठिकाणी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या पोटनिवडणुकीसाठी अभिजीत बिचुकले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.अभिजीत बिचुकले यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
अभिजीत बिचुकले विधानसभेच्या रिंगणात
बारामतीत पोटनिवडणुकीचा रणसंग्राम तापायला सुरुवात झाली आहे.या रणांगणात पुन्हा एकदा एंट्री कायम चर्चेत असणाऱ्या चेहऱ्याची म्हणजेच स्वतःला शिवछत्रपतींचे वैचारिक वारस म्हणवणाऱ्या डॉ. अभिजीत वामनराव आवाडे बिचुकले यांनी बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत त्यांनी सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात शड्डू ठोकला आहे.
निवडणूक म्हटलं की अभिजीत बिचुकले नेहमी उमेदवारी अर्ज दाखल करतात. बारामती विधानसभा पोटनिवडणूक त्याच जोशात ही पोटनिवडणूक लढवणार असल्याचा निर्धार अभिजीत बिचुकले यांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे…उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या विरोधात थेट शड्डू ठोकत अभिजीत बिचुकले मैदानात उतरले आहेत.त्यामुळे बारामतीतील लढत आणखी रंगतदार होणार हे नक्की आहे. येत्या दोन दिवसांत अपक्ष उमेदवारी अर्ज का भरला… यामागची सविस्तर भूमिका पत्रकार परिषद घेऊन मांडणार असल्याचंही बिचुकले यांनी स्पष्ट केलं आहे.
बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत 12 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये अभिजीत कांबळे, दादा एकनाथ थोरात,संकेत गावडे,अनिल तपे, रझ्जाक उर्फ अब्दुलरौफ जफर मुलाणी,अभिजीत वामनराव आवाडे बिचुकले, विलास होळकर,संदीप जनार्दन खरात,मिथुन सोपानराव आटोळे, अरुण नितुरे, दत्तात्राय रावसाहेब बेडरे,दिलीप प्रभाकर अलोनी,त्रिशला कांबळे, गजानान उत्तम गवळी, रघू येताळा घुटूकडे,सागर शरद भिसे,सतिश कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघासाठी यांनी अर्ज दाखल केल्यानं निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी दिसून येते.
सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरे यांना फोन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सुनेत्रा पवार यांनी बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पाठिंबा मिळावा यासाठी उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. सुनेत्रा पवार यांच्याकडून काँग्रेस पक्षनेतृत्त्वासोबत देखली संपर्क साधला जाणार असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक देखील जय पवार यांची आज बैठक घेण्यात आली.
आणखी वाचा
Comments are closed.