अभिषेक बच्चनने विकला मुंबईतील महालक्ष्मी परिसरातील अलिशान फ्लॅट, 14.5 कोटींची डील
बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चन सध्या त्याच्या वैयक्तीक आयुष्याबरोबरच व्यवहारांमुळेही चर्चेत आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेकने त्याचे मुंबईतील पॉश महालक्ष्मी परिसरातील त्याचे आलिशान डुप्लेक्स अपार्टमेंट विकले आहे. हा व्यवहार 14.5 कोटींचा झाल्याचे सांगितले जात आहे.
अभिषेकच्या या हाय-प्रोफाइल विक्रीमुळे रिअल इस्टेट मार्केटमध्ये मोठी चर्चा निर्माण झाली आहे. कारण, सेलिब्रिटींनी खरेदी आणि विक्री केलेली मालमत्ता ही अनेकदा मोठी गुंतवणूक म्हणून मानली जाते. हा करार 12 फेब्रुवारी 2026 रोजी अधिकृतपणे नोंदणीकृत झाला. हे आलिशान घर प्रतिष्ठित महालक्ष्मी प्रकल्प असलेल्या गोदरेज प्लॅनेटच्या टॉवर 4 च्या 40 व्या आणि 41 व्या मजल्यावर आहे. या मालमत्तेचे एकूण कार्पेट एरिया 2,249 चौरस फूट आहे. त्याचबरोबर व्यवहाराची किंमत अंदाजे 64,473 प्रति चौरस फूट आहे. या कराराचे वैशिष्ट्य म्हणजे 14.5 कोटींच्या या किंमतीत खरेदीदारांना अपार्टमेंटसह तीन कार पार्किंग स्लॉट देखील मिळणार आहेत. महालक्ष्मीमध्ये स्थित गोदरेज प्लॅनेट हे मुंबईतील सर्वात प्रीमियम निवासी प्रकल्पांपैकी एक मानले जाते.
Comments are closed.