किंगच्या सेटवरील अभिषेक बच्चनचा विलनचा लूक व्हायरल, नवा लूक बघून चाहते आश्चर्यचकित
अभिषेक बच्चन सध्या दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांच्या आगामी ॲक्शन चित्रपट ‘किंग’चे चित्रीकरण करत आहे. या चित्रपटात तो शाहरुख खानसोबत विलनच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. या बिग बजेट चित्रपटामध्ये सुहाना खान, दीपिका पदुकोण, जयदीप अहलावत आणि अनिल कपूर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. अभिषेक बच्चनचा चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो एका दमदार ॲक्शन अवतारात दिसत आहे. अभिषेक या चित्रपटामध्ये विलनच्या भूमिकेत दिसणार असल्याने, त्याचे चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत.
किंग या चित्रपटामध्ये अभिषेक एका नवीन अवतारात दिसणार आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांची उत्सुकता अधिक वाढली आहे. अभिषेकचा या चित्रपटातील लूक व्हायरल झाल्याने आता या चित्रपटाविषयी अधिक चर्चा होऊ लागली आहे. अभिषेकच्या हातात बंदूक असून, एका अॅक्शन सीनचे शूटींग यावेळी करण्यात येत आहे. या फोटोंवरुनच स्पष्ट होत आहे की, अभिषेक बच्चन ‘किंग’मध्ये शाहरुख खानच्या विरोधात एका शक्तिशाली खलनायकाची भूमिका साकारत आहे. असे वृत्त दैनिक जागरणने दिले आहे. लूक व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडिया युझर्स या फोटोंवर कमेंट करत आहेत. एका युझरने लिहिले, “तो ‘करण अर्जुन’मधील ठाकूर दुर्जन सिंगसारखा दिसतो.” दुसऱ्याने लिहिले, “‘किंग’ चित्रपटातील खलनायक!”
यापूर्वी, जेव्हा दीपिका आणि शाहरुख ‘किंग’च्या शूटिंगसाठी दक्षिण आफ्रिकेत होते, तेव्हा शूटिंगच्या पडद्यामागील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, ज्यांनी लगेचच चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. एका फोटोमध्ये, शाहरुख आणि दीपिका एका डान्स सीक्वेन्सचे चित्रीकरण करत होते, तर रणवीर आणि दुआ दूरून पाहत होते. रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि मार्फ्लिक्स पिक्चर्स निर्मित ‘किंग’ हा चित्रपट ख्रिसमसला प्रदर्शित होणार आहे.
Comments are closed.