ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या वनडेमध्ये अभिषेक शर्मा शून्यावर माघारी, तर तिलक वर्मा- रियान परागची शानदार खेळी!

आशिया कप 2025 (Asia Cup 2025) जिंकल्यानंतर टीम इंडियाच्या स्टार फलंदाज अभिषेक शर्मा (Abhishek Sharma & Tilak Verma) आणि तिलक वर्मा ऑस्ट्रेलिया एविरुद्ध वनडे सिरीजमध्ये खेळत आहेत. कानपूरमध्ये या मालिकेचा दुसरा सामना रंगत आहे. आशिया कप संपल्यानंतर दुसऱ्या वनडेमध्ये अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा यांना टीममध्ये स्थान मिळाले आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी ही भारतीय खेळाडूंची कसोटी आहे. या सामन्यात अभिषेक शर्मा ‘0’ वर बाद झाला, तर तिलक वर्माने दमदार 94 धावा केल्या. याशिवाय, रियान परागनेही (Riyaan Parag) चांगली खेळी केली.

आशिया कपमध्ये अभिषेकने भरपूर धावा केल्या होत्या आणि तो स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. पण आज ऑस्ट्रेलिया एविरुद्धच्या सामन्यात तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला आणि त्याने खातं उघडलं नाही.

अभिषेकसाठी आजचा दिवस विशेष होता कारण त्याची बहीण कोमल शर्माचा लग्नसोहळा 3 ऑक्टोबरला होत आहे. तरीही त्याने राष्ट्रीय कर्तव्य पार पाडत ऑस्ट्रेलिया एविरुद्ध सामन्यात भाग घेतला, पण खेळात त्याला यश मिळाले नाही.

आशिया कप फायनलमध्ये पाकिस्तानविरुद्ध रोमांचक विजय मिळवणाऱ्या तिलक वर्माने दुसऱ्या वनडेमध्ये 122 चेंडूत 94 शानदार धावा केल्या. या डावात त्याने 5 चौकार आणि 4 षटकार लगावले. तिलकने टी20सोबत वनडेमध्येही आपला फॉर्म कायम ठेवला आहे. 19 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी त्याला टीममध्ये समाविष्ट केले जाऊ शकते.

कानपूरमध्ये भारत ए आणि ऑस्ट्रेलिया ए यांच्यातील अनऑफिशियल दुसऱ्या वनडे सामन्यात रियान परागनेही शानदार खेळ केला. त्याने 54 चेंडूत 58 धावा केल्या, ज्यात 6 चौकार आणि 1 षटकार होता. भारत एने ऑस्ट्रेलिया ए टीमसाठी 247 धावांचं लक्ष्य दिलं आहे

Comments are closed.