‘माझं वजन कमी झालंय…’, IND vs PAK सामन्यापूर्वी अभिषेक शर्माचा धक्कादायक खुलासा; नेमकं घडलंय

अभिषेक शर्मा हेल्थ अपडेट : टी-20 विश्वचषक 2026 मधील टीम इंडियाच्या दुसऱ्या सामन्यात अभिषेक शर्मा खेळला नाही. दिल्लीला पोहोचल्यानंतर त्याची तब्येत बिघडली. त्याच्या पोटात इन्फेक्शन झाल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आणि ज्यामुळे त्याला दोन दिवस रुग्णालयात दाखल व्हावे लागले. नामिबियाविरुद्धच्या सामन्यावेळी तो भारतीय संघासोबत मैदानात होता, मात्र त्यांच्या चेहऱ्यावरून तो पूर्णपणे बरा नसल्याचे जाणवत होते. भारताचा पुढील सामना पाकिस्तानविरुद्ध असल्याने या मोठ्या लढतीआधी तो बरा होईल का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

दिल्लीमध्ये मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या घरी आयोजित कार्यक्रमाला अभिषेक उपस्थित होता. मात्र तेथून तो लवकर निघून गेला. त्याच वेळी त्याला अस्वस्थ वाटू लागल्याचे सांगितले जाते. पुढे पोटात इन्फेक्शन झाल्याचे माहिती मिळाल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. 11 फेब्रुवारी रोजी त्याला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आणि तो पुन्हा संघात दाखल झाला. मात्र नामिबियाविरुद्धच्या सामन्यात त्याला विश्रांती देण्यात आली.

अभिषेक शर्माचा व्हिडिओ व्हायरल…

अर्शदीप सिंग आणि अभिषेक शर्मा यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात अर्शदीप अभिषेकला तब्येतीबद्दल विचारताना दिसतो. त्यावर अभिषेक म्हणाले की, आता बरा आहे. मात्र अर्शदीपने “तू बारीक झालास का?” असा प्रश्न विचारल्यावर अभिषेकने हसतच सांगितले की तब्येत ठीक आहे, पण थोडे वजन कमी झाले आहे.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अभिषेक खेळणार का?

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अभिषेक खेळणार का, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. यूएसएविरुद्धच्या सामन्यापूर्वीच तो आजारी पडल्याचीही माहिती समोर आली आहे. त्या सामन्यात तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता. दरम्यान, दिल्लीमध्ये त्याला सराव करताना पाहण्यात आले आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव यानेही अलीकडील वक्तव्यात सांगितले की, अभिषेक अजून पूर्णपणे तंदुरुस्त नाहीत. त्यामुळे त्याच्या पुनरागमनाबाबत बीसीसीआय कोणतीही घाई करणार नसल्याचे संकेत मिळत आहेत.

टी-20 विश्वचषक 2026 साठी भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, इशान किशन, हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रिंकू सिंग.

हे ही वाचा –

T20 World Cup 2026:  टीम इंडियाचा दबदबा! पाकिस्तानची घसरण, सुपर-8 च्या शर्यतीतून 6 संघ जवळपास OUT, पाहा Points Table अपडेट

आणखी वाचा

Comments are closed.