IND vs WI: अभिषेक शर्माची ऐतिहासिक कामगिरी! मायदेशात ‘ही’ कामगिरी करणारा ठरला सातवा भारतीय

भारत आणि वेस्ट इंडिज (T20 series between IND vs WI) यांच्यातील 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना रांचीच्या मैदानावर खेळवला जात आहे. नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. या सामन्यात सर्वांचे लक्ष आक्रमक सलामीवीर अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) याच्याकडे होते. मात्र, तो केवळ 20 धावा करून माघारी परतला. जरी असले तरी अभिषेकने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

मायदेशात टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1 हजार धावा पूर्ण करणारा तो सातवा भारतीय खेळाडू ठरला आहे. यासह त्याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सातत्याने दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या विशेष यादीत स्थान मिळवले आहे.

टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर अभिषेक शर्माने सलामीवीर म्हणून संघातील आपले स्थान पक्के केले. त्याने मायदेशात आणि परदेशातही अनेक मोठ्या खेळी केल्या आहेत.

अभिषेक शर्मा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2 हजार धावा पूर्ण करण्याच्या जवळ पोहोचला आहे. त्याने मायदेशात केवळ 29 सामन्यांमध्ये 36.07 च्या सरासरीने 1,010 धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने 2 शतके आणि 6 अर्धशतके झळकावली आहेत.

भारतीय संघाकडून मायदेशात टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या (Virat Kohli) नावावर आहे. त्याने मायदेशात 46 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळताना 50.87 च्या सरासरीने 1,577 धावा केल्या आहेत.

मायदेशात सर्वाधिक टी-20 आंतरराष्ट्रीय धावा करणारे भारतीय खेळाडू!

विराट कोहली – 1,577 धावा
रोहित शर्मा – 1,532 धावा
सूर्यकुमार यादव – 1,530 धावा
इशान किशन – 1,246 धावा
हार्दिक पांड्या – 1,212 धावा
केएल राहुल – 1,018 धावा
अभिषेक शर्मा – 1,010 धावा

टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पूर्ण सदस्यत्व असलेल्या संघांच्या खेळाडूंमध्ये पहिल्या षटकात सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीतही अभिषेक शर्माने अव्वल स्थान मिळवले आहे.

त्याने आयर्लंडच्या पॉल स्टर्लिंगला मागे टाकत हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. अभिषेकने आतापर्यंत टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्या षटकात एकूण 14 षटकार मारले आहेत. तर पॉल स्टर्लिंगच्या नावावर 13 षटकारांची नोंद आहे.

Comments are closed.