केस धरुन…अभिषेक शर्माचा रुद्रावतार; दिग्वेश राठीला भिडला, हात उचलणार तेवढ्यात…, VIDEO

अभिषेक शर्मा आणि दिगवे रठी लढा: आयपीएल 2025 च्या हंगामातील लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबादच्या (LSG vs SRH) सामन्यात जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळाला. लखनौचा गोलंदाज दिग्वेश राठी आणि हैदराबादचा फलंदाज अभिषेक शर्मा सामना सुरु असताना (Abhishek Sharma and Digvesh Rathi Fight) भर मैदानात एकमेकांना भिडले. यावेळी अंपायरसह लखनौ आणि हैदराबादच्या इतर खेळाडूंना मध्यस्थी करावी लागली.

दिग्वेश राठीने (Digvesh Rathi) अभिषेक शर्माला (Abhishek Sharma) बाद केल्यानंतर दोघांमध्ये काहीतरी बोलणं झालं. अभिषेक बाद झाल्यानंतर दिग्वेश सतत काहीतरी बोलत होता. यावेळी अभिषेक शर्माही त्याला नडला. यादरम्यान अभिषेक आणि दिग्वेश एकमेकांवर हात उचलणार की काय?, असं क्रिकेट चाहत्यांना वाटलं. परंतु तेवढ्यात ऋषभ पंत आला आणि त्याने दिग्वेशला मागे खेचले आणि त्याला समजावले. अभिषेक रागाने त्यांच्याकडे हातवारे करत मैदानाबाहेर गेला. दिग्वेश राठीचे केस मोठी आहेत. त्यामुळे अभिषेक शर्मा दिग्वेश राठीकडे रागाने बघत आणि केस पकडेल…असे हातवारे करत मैदानाबाहेर गेल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. दरम्यान, सामना संपल्यानंतर, दिग्वेश आणि अभिषेक यांनी हस्तांदोलन केले आणि त्यांच्यात काही संवाद झाला. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला देखील अभिषेक आणि दिग्वेशचे दोघांचे बोलणे ऐकताना दिसले.

दिग्वेश राठीवर एका सामन्याची बंदी-

दिग्वेश राठीला एका सामन्यासाठी बंदी घातली जाईल. दिग्वेश आता लखनौ सुपर जायंट्सच्या पुढील सामन्यात खेळू शकणार नाही. लखनौचा पुढील सामना 22 मे 2025 रोजी अहमदाबाद येथे गुजरात टायटन्स विरुद्ध आहे.

अभिषेक शर्मालाही दंड ठोठावला-

सनरायझर्स हैदराबादचा अष्टपैलू खेळाडू अभिषेक शर्मालाही आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल त्याच्या सामना शुल्काच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. या हंगामात अभिषेकचा कलम 2.6 अंतर्गत हा पहिलाच लेव्हल 1 गुन्हा होता आणि त्यामुळे त्याला एक डिमेरिट पॉइंट मिळाला आहे. लेव्हल 1 च्या आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास, मॅच रेफ्रीचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असतो.

सनरायझर्स हैदराबादचा 6 विकेट्सने विजय-

आयपीएल 2025 च्या हंगामात काल लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने 6 विकेट्सने विजय मिळवला. या पराभवासह लखनौचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. मिशेल मार्श, ऐडन मार्करम यांच्या अर्धशतकांच्या जोरावर लखनौने 20 षटकांत सात बाद 205 धावांपर्यंत मजल मारली. हैदराबादने 18.2 षटकांत चार बाद 206 धावा करत विजय साकारला. दरम्यान, लखनौ आणि हैदराबादच्या सामन्यात एक जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळाले.

संबंधित बातमी:

Abhishek Sharma and Digvesh Rathi Fight: अभिषेक शर्मा अन् दिग्वेश राठी भर मैदानात भिडले; थेट बीसीसीआयचे उपाध्यक्ष मध्यस्थीसाठी धावले, काय घडलं?, VIDEO

अधिक पाहा..

Comments are closed.