दिल्ली विमानतळावर भारतीय खेळाडूसोबत गैतवर्तन, फ्लाईटही चुकली; इंस्टा स्टोरी द्वारे संताप व्यक्त

दिल्ली विमानतळावर टीम इंडियाचा उदयोन्मुख स्टार अभिषेक शर्मासोबत गैरवर्तनाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अभिषेक शर्मानं सोमवार, 12 जानेवारी रोजी त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीद्वारे याची माहिती दिली. दिल्ली विमानतळावरील एका कर्मचाऱ्याच्या गैरवर्तनामुळे विमान चुकल्याचंही अभिषेकनं सांगितलं. येथे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, 22 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी अभिषेक शर्माची भारतीय संघात निवड झाली आहे.

अभिषेक शर्मानं इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करून या घटनेवर राग व्यक्त केला. भारतीय क्रिकेटपटूनं दावा केला की त्याला अनावश्यकपणे काउंटरमध्ये पाठवण्यात आलं, ज्यामुळे त्याची फ्लाइट चुकली. त्यानं विमानळावरील एका कर्मचाऱ्याचंही नाव घेतलं आणि कारवाईची मागणी केली.

अभिषेक शर्मानं त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये म्हटलं की, “दिल्ली विमानतळावर इंडिगोसोबत मला सर्वात वाईट अनुभव आला. कर्मचाऱ्यांचं, विशेषतः काउंटर मॅनेजर सुष्मिता मित्तलचं वर्तन पूर्णपणे अस्वीकार्य होतं. मी वेळेवर योग्य काउंटरवर पोहोचलो, पण त्यांनी मला अनावश्यकपणे दुसऱ्या काउंटरवर पाठवलं.”

अभिषेकनं पुढे लिहिलं, “नंतर मला सांगण्यात आलं की चेक-इन बंद आहे, ज्यामुळे माझी फ्लाइट चुकली. माझ्याकडे फक्त एक दिवस सुट्टी होती, जी आता पूर्णपणे वाया गेली आहे. परिस्थिती आणखी वाईट झाली, कारण ते कोणतीही मदत देत नाहीत. हा माझा सर्वात वाईट एअरलाइन अनुभव आहे.”

अभिषेक शर्मा विजय हजारे ट्रॉफीमध्ये पंजाबचं नेतृत्व करत होता. 11 जानेवारी रोजी वडोदरा येथे महाराष्ट्राविरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यात त्याचा संघ हरला. यासह पंजाबचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. या स्पर्धेत अभिषेक चांगल्या फॉर्ममध्ये होता. या डावखुऱ्या फलंदाजानं आठ सामन्यांमध्ये एक शतक आणि तीन अर्धशतकांसह 467 धावा केल्या.

हेही वाचा –

तेम्बा बवुमा कर्णधार, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दक्षिण आफ्रिकेनं जाहीर केला घातक संघ!
आता आयपीएल खेळाडूंवर दया नाही, बीसीसीआयनं नियमात केला मोठा बदल!
विराट-रोहितसह वरिष्ठ खेळाडूंना बीसीसीआयचे कडक आदेश, पालन न केल्यास परिणाम भोगावे लागतील!

Comments are closed.