चौकार-षटकारांचा पाऊस, पण सूर्याच्या चुकीमुळे अभिषेक शर्माचं शतक हुकलं; नेमकं काय घडलं; VIDEO एक


अभिषेक शर्मा: आशिया कप 2025 च्या सुपर फोरमध्ये भारतीय संघ बांगलादेशचा सामना करत आहे. आशिया कपच्या सुपर-4 सामन्यात भारताने बांगलादेशसमोर 169 धावांचे लक्ष्य ठेवले. भारताकडून अभिषेक शर्माने सर्वाधिक 75 धावा केल्या पण तो धावबाद झाला. त्याच्या बाद झाल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादववर जोरदार टीका होत आहे. अभिषेक शर्माच्या धावबाद होण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

डावाची सुरुवात करताना अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली, परंतु मधल्या षटकांमध्ये भारताची फलंदाजी पूर्णपणे फेल ठरली. दरम्यान, अभिषेक ज्या पद्धतीने फलंदाजी करत होता, त्यामुळे त्याला त्याच्या टी-20 कारकिर्दीतील तिसरे शतक झळकावण्याची संधी मिळाली होती, परंतु सूर्याची चूक महागात पडली.

अभिषेक शर्माची तूफानी खेळी

सामना चालू झाला तेव्हा, अभिषेक शर्माने पहिल्या 9 चेंडूत फक्त 9 धावा काढल्या, पण एकदा तो सेट झाला की त्याने त्याचे शॉट्स खेळायला सुरुवात केली. बांगलादेशचा कोणताही गोलंदाज समोर असला तरी त्याने धू धू धुतले. अभिषेक शर्माने पहिल्या 25 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आणि 37 चेंडूत 75 धावा केल्या. तिथून त्याचे शतक होण्याची शक्यता खूप जास्त दिसत होती, पण कर्णधार सूर्यकुमार यादवच्या एका चुकीमुळे अभिषेक शर्माचे शतक हूकले, या सामन्यात अभिषेक शर्मा 75 धावांवर आऊट झाला.

सूर्या आणि अभिषेक यांच्यात काय घडलं?

बांगलादेशच्या डावाच्या 12 व्या षटकात टाकण्यासाठी आलेल्या डावखुरा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहीमने पहिला चेंडू ऑफ स्टंपवर बॅक-ऑफ-लेंथ ऑफ-कटर टाकला, जो कर्णधार सूर्याने बॅकवर्ड पॉइंटकडे मारला. दरम्यान, बॅकवर्ड पॉइंटवर उभा असलेला रिशाद हुसेन पटकन डावीकडे उडी मारली, चेंडू उचलतो आणि लगेचच तो बॉलिंग एंडवर फेकतो. तोपर्यंत अभिषेक शर्मा धाव घेण्यासाठी अर्ध्या खेळपट्टीत आला होता, परंतु सूर्याच्या नकारामुळे त्याला परत जावे लागले, परिणामी तो धावबाद झाला. जेव्हा मुस्तफिजूरने अभिषेक शर्माला धावबाद केले तेव्हा तो फ्रेममध्ये दिसत नव्हता, याचा अर्थ असा की तो जवळजवळ स्ट्रायकर एंडपर्यंत पोहोचला होता, परंतु कर्णधाराच्या नकारामुळे त्याला परतावे लागले तेव्हा तो तसे करू शकला नाही.

हे ही वाचा –

Abhishek Sharma Ind vs Ban : 200+ स्ट्राईक रेटने अभिषेकचा कहर, युवराज सिंगच्या रेकॉर्डला गवसणी, रोहित-राहुलला मागे टाकलं

आणखी वाचा

Comments are closed.